Operation Sindoor : पाकची दाणादाण, ब्रह्मोस खरेदीसाठी लागली रांग, डिफेन्स एक्सपोर्टमध्ये तुफान वाढ, शेअर बाजारात कुणाला फायदा?
Missiles Defense Exports : भारताने पाकिस्तानला आस्मान दाखवले. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचे कंबरडे मोडले. भारतीय क्षेपणास्त्रांनी पाकची झोप उडवली. त्यात ब्रह्मोसने चोख कामगिरी बजावली. या मिसाईल खरेदीसाठी आता जगभरातून मागणी वाढली आहे.

ऑपरेशन सिंदूरमधून भारताची लष्करी ताकदच नाही तर शस्त्र सज्जता पण दिसून आली. ब्रह्मोसने पाकला मोठा तडाखा दिला. त्याचे पुरावे भारताने जागतिक मंचावर मांडले. त्यानंतर भारतीय मिसाईलची मागणी वाढली आहे. जगभरातून ब्रह्मोससह इतर शस्त्रांची मागणी वाढली आहे. भारताचा डिफेन्स एक्सपोर्ट, संरक्षण निर्यात वाढली आहे. भारताच्या जवळपास 100 कंपन्या संरक्षण उत्पादन बाहेर पाठवत आहेत. केंद्र सरकारने वर्ष 2024-25 साठी 6.21 लाख कोटी रुपये दिले. गेल्या वर्षी हा निधी 5.94 लाख कोटी होता. एका वर्षात त्यात 4.3 टक्के अधिक आहे.
ब्रह्मोस क्रूज मिसाईल
भारतीय संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न फायदेशीर ठरला आहे. ब्रह्मोस क्रूज मिसाईलसह तोफखाना आणि बंदुकीचे विविध प्रकार आणि शस्त्राच्या निर्यातीचा विस्तार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी दिल्लीत नेहमी घडामोडी घडत असतात. भारताने 2024-25 पर्यंत वार्षिक संरक्षण निर्यात 35,000 कोटी रुपयांपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
संरक्षण क्षेत्रात ठोकणार मांड
भारत संरक्षण क्षेत्रात मोठी भरारी घेण्याच्या तयारीत आहे. आता भारत शस्त्र निर्मिती आणि विक्रीत आत्मनिर्भरच नाही तर मोठा निर्यातक होण्याच्या मार्गावर आहे. आता कतार, लेबनॉन, इराक, इक्वाडोर, जापानच नाही तर काही युरोपियन देशांनी सुद्धा भारतीय शस्त्रास्त्र खरेदीत रूची दाखवली आहे. केवळ शस्त्रास्त्रच नाही तर चिलखतापासून ते इतर सुरक्षा प्रणालींची निर्यात सुद्धा वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी उसळी येण्याची शक्यता आहे.
या उत्पादनांना जगभरात मागणी
मिसाईल – ब्रह्मोस, आकाश आणि पिनाक
विमान – डोर्नियर-228, एलसीए तेजस आणि एएलएच
तोफखाना – 155 मिमी/52 कॅलिबर डीआरडीओ टोड आर्टिलरी गन सिस्टिम, धनुष आर्टिलरी गन सिस्टीम
टँक- चिलखती वाहनं, टँक वाहनांची मागणी वाढली आहे
नौदल – भारतीय पाणबुड्या, युद्धनौका, तेज इंटरसेप्टर बोट, हलके टॉरपीडोची खरेदी वाढली. अनेक देशांकडून मागणी करण्यात येत आहे.