Tirupati Temple : व्यंकटरमणा गोविंदा! बालाजी चरणी 2900 किलो सोन्याचे दान..

Tirupati Temple :तिरुपती बालाजीच्या खजिन्यात पुन्हा भर पडली. भाविकांनी भरभरुन दान केले..

Tirupati Temple : व्यंकटरमणा गोविंदा! बालाजी चरणी 2900 किलो सोन्याचे दान..
तिरुपती संस्थानची जोरदार संपत्तीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 06, 2022 | 10:06 PM

नवी दिल्ली : जगातील श्रीमंत देवस्थान तिरुमाला तिरुपती देवस्थानमने (TTD) संपत्ती जाहीर केली. भाविकांनी कोरोना (Corona Virus) काळातही देवस्थानला भरभरुन दान (Charity) केल्याचे यामध्ये उघड झाले. या संपत्तीची आकडेवारी डोळे दिपवणारी आहे. देणगीत जराही कमी आलेली नाही, उलट देणगीत वाढ झाली आहे.

गेल्या तीन वर्षांत तिरुपती मंदिरात (Tirupati Temple) जवळपास 2,900 किलोग्रॅम सोन्याचे दान करण्यात आले. देवस्थान ट्रस्टने शनिवारी मुदत ठेवी आणि गोल्ड डिपॉजिट्सची संपत्ती जाहीर केली.

आकडेवारीनुसार, तिरुपती मंदिराकडे जवळपास 10.3 टन सोने आणि 15,938 कोटी रुपयांचे भंडार आहे. निधीचा ओघ सुरुच आहे. त्यामुळे सध्याच्या ट्रस्ट बोर्डाने 2019 नंतर गुंतवणूक करण्यावर भर दिला आहे.

हे सुद्धा वाचा

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, मंदिर ट्रस्टचे स्वर्ण भांडार 2019 साली, 7339.4 टन होता. पण आता हे भंडार 10.3 टनाचे झाले. गेल्या 3 वर्षांत जवळपास 2.9 टन (2,900 किलोग्राम) सोन्याची वृद्धी झाली.

हे सोने सरकारी बँकांमध्ये गोल्ड डिपॉजिटच्या रुपाने जमा आहे. या सोन्याचा बाजारभाव सर्वांनाच थक्क करणारा आहे. या 10.3 टनाचे बाजार मूल्य खूप मोठे आहे. सध्याच्या दरानुसार,त्याची 5,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत आहे.

मंदिराचे एकूण भांडवल गेल्या तीन वर्षांत 2.26 लाख कोटी रुपय झाले आहे. TTD चे अधिकारी एवी धर्म रेड्डी (AV Dharma Reddy) यांनी याविषयीची माहिती दिली. 2019 मध्ये अनेक बँकांचे मिळून मुदत ठेवीत 13,025 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

दरवर्षी या रक्कमेत वाढ होत आहे. यंदा ही रक्कम वाढून 15,938 कोटी रुपये मुदत ठेवीत ठेवण्यात आले आहे. संस्थानच्या गुंतवणूकीत जवळपास 2,900 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

अहवालानुसार, मंदिराच्या मालकीच्या संपूर्ण देशात 960 मालमत्ता आहेत. या मालमत्ता 7,123 एकरवर आहेत. मंदिराच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत दान आहे. भाविक, व्यापारी आणि अनेक संस्था दररोज दानधर्म करतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.