AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol, Diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे (Fuel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

Today Petrol, Diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
पेट्रोल, डिझेल दर Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 30, 2022 | 8:46 AM
Share

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे (Fuel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून देशात पेट्रोल (petrol rate), डिझेलचे दर (diesel price) स्थिर आहेत. गेल्या 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 22 मे पासून पेट्रोलचा दर प्रति लिटर साडेनऊ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर सहा रुपयांनी कमी झाला. तेव्हापासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. दुसरीकडे राज्याबाबत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर राज्यात पेट्रोल व डिझेल स्वस्त झाले, मात्र अद्यापही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर हे अधिक आहेत. कच्च्या तेलाच्या दरात चढ उतार सुरू असल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे.

प्रमुख महानगरातील आजचे दर

पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये असून डिझेलचा भाव हा प्रति लिटर 94.28 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.6593.14
कोल्हापूर106.0292.54

दररोज जारी केले जातात दर

पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या दरावर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने बदलत असतात. कच्चे तेल स्वस्त झाले तर इंधनाचे दर देखील कमी होतात. तर कच्चे तेल महाग झाले तर पेट्रोल, डिझेलच्या दरात देखील वाढ होते. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर हे दररोज सकाळी जारी केले जातात. भारतात गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच