AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol, Diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचा भाव

Today Petrol, Diesel Rate : देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात राज्याच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

Today Petrol, Diesel Rate : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचा भाव
| Updated on: Jul 29, 2022 | 12:45 PM
Share

नवी दिल्ली : देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel, Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल (Petrol), डिझेलचे(Diesel) दर स्थिर आहेत. 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे 22 मेला पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले. तेव्हापासून देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे राज्यात काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंधनावरील व्हॅट कपातीची घोषणा केली, व्हॅट कमी करण्यात आल्याने राज्यात देखील पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले आहेत. मात्र इतर राज्यांच्या तुलनेत अद्यापही महाराष्ट्रातील दर हे जादा आहेत. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. मात्र देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे.

प्रमुख महानगरातील दर

पेट्रोलियम कंपन्यांनी आज जारी केलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये एवढा आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये इतका आहे.कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 102.63 तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.24 रुपये एवढा आहे. प्रमुख महागनराच्या भावाची तुलना करायची झाल्यास सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल हे दिल्लीमध्ये तर सर्वात महाग पेट्रोल, डिझेल मुंबईमध्ये आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.6593.14
कोल्हापूर106.0292.54

दररोज जारी होतात इंधनाचे नवे दर

पेट्रोल, डिझेलच्या किमती या कच्च्या तेलावर अवलंबून असतात. कच्च्या तेलाचे दर कमी झाले तर इंधनाचे दर देखील स्वस्त होतात. तर कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यास पेट्रोल, डिझेलचे भाव देखील वाढतात. त्यामुळे दररोज सकाळी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी करण्यात येतात.भारतात गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच