Today Petrol, Diesel Rate : व्हॅट कपातीनंतर राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त; जाणून घ्या देशासह राज्यातील इंधनाचे दर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवरील (Diesel)व्हॅट कमी करण्याची मोठी घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल प्रति लिटरमागे पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Today Petrol, Diesel Rate : व्हॅट कपातीनंतर राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त; जाणून घ्या देशासह राज्यातील इंधनाचे दर
पेट्रोल, डिझेल दर Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 9:25 AM

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवरील (Diesel)व्हॅट कमी करण्याची मोठी घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल प्रति लिटरमागे पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा ठरला आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत. नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर  94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव  106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत. महाराष्ट्र वगळता इतर राज्यात मात्र पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. इतर राज्यात इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे.

मुख्यमंत्र्यांकडून व्हॅट कपातीची घोषणा

केंद्राकडून यावर्षी 21 मेला पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्यात आली होती. त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्थ झाले होते. केंद्रप्रमाणेच अनेक राज्यांनी देखील पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात केली होती. मात्र महाराष्ट्रात व्हॅट कमी करण्यात न आल्याने पेट्रोल, डिझेलचे दर सर्वाधिक होते. व्हॅट कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. नवे सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हॅट कपातीची घोषणा केली आहे. व्हॅट कमी करण्यात आल्याने पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे.

हे सुद्धा वाचा

राज्याच्या प्रमुख शहरांमधील दर

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई106.3594.28
पुणे106.1092.58
नाशिक106.2292.70
नागपूर106.65 93.14
कोल्हापूर106.02 92.54

महानगरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

आज जारी करण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेलच्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर  96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर  94.28 रुपये एवढा झाला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर अनुक्रमे 102.63 आणि 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रलचा भाव प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76  रुपये इतका आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.