Yamini Jadhav : साहेबांना आमची खूप काळजी; गुवाहाटीमध्ये मुख्यमंत्री एकही दिवस नीट झोपू शकले नाही, यामिनी जाधवांकडून एकनाथ शिंदेंचे कौतुक

दादरच्या रविंद्र नाट्य मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा औरंगाबाद पश्चिम विधानसभेतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना आमदार यामिनी जाधव यांनी आम्ही पन्नास आमदार मुख्यमंत्र्यांसोबत असल्याचे म्हटले आहे.

Yamini Jadhav : साहेबांना आमची खूप काळजी; गुवाहाटीमध्ये मुख्यमंत्री एकही दिवस नीट झोपू शकले नाही, यामिनी जाधवांकडून एकनाथ शिंदेंचे कौतुक
यामिनी जाधवImage Credit source: google
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 8:43 AM

मुंबई : दादरच्या रविंद्र नाट्य मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा औरंगाबाद (Aurangabad) पश्चिम विधानसभेतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. रात्री दोनच्या सुमारास औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या नेतृत्वाखाली हा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. या कार्यक्रमाला आमदार यामिनी जाधव यांची देखील उपस्थिती होती. या सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना यामिनी जाधव यांनी म्हटले की, गेल्या 15 दिवसांत आमचे विचार बदलले आहेत. आम्ही 50 आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहोत. शिंदे साहेब हे कायम आमच्या पाठिशी उभे होते. आम्ही जेव्हा गुवाहाटीमध्ये होतो, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी आमची खूप काळजी घेतली. कोणाची प्रकृती बिघडली तर सर्वात आधी तिथे मुख्यमंत्री हजर असायचे. ते रोज सकाळी आमच्यासोबत संवाद साधायचे. त्यांनी आम्हाला कधीही एकटे सोडले नाही. या सर्व प्रवासात एकनाथ शिंदे यांना एकही दिवस निट झोप लागली नाही, असे यामिनी जाधव यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

दरम्यान या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी करत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधाला आहे. आज एकदम ओके वाटत आहे. आजचा मेळावा ऐतिहासिक आहे आणि आम्ही ऐतिहासिकच कामगिरी केलीये, मध्यरात्री असा मेळावा कोणी घेऊ शकत नाही. जे काही चाललं होतं त्यात संजय शिरसाट पुढे होते. ते विचारायचे साहेब कधी करणार? कसे करायचे मी त्यांना संयमाचा सल्ला दिला. मात्र सहा महिन्यांत चित्र बदलत गेले. सगळीकडे आम्हाला घातक चित्र दिसू लागलं. आम्ही खूप प्रयत्न केले मात्र काहीच उपयोग झाला नाही. सर्व निधी राष्ट्रवादीच्या आमदारांना मिळत होता. आमचे आमदार निधीपासून वंचित होते. यात आमचा स्वार्थ नाही मात्र जनतेची कामे लक्षात घ्यावी लागतात असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेवर निशाणा

दरम्यान या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर देखील अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ते आमच्या विरोधात दररोज न्यायालयात जातात, मात्र त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या जात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आज आमच्या कार्यकर्त्यांना काय मिळालं? उलट त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले आहेत. मी असेपर्यंत शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागणार नाही, खोट्या केसेस दाखल केल्या जाणार नाहीत. जो अधिकारी असे करेल त्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.