AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today petrol, diesel rates: कच्च्या तेलाच्या दरात तेजी, पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

आज कच्च्या तेलाच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

Today petrol, diesel rates: कच्च्या तेलाच्या दरात तेजी, पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
| Updated on: Jun 10, 2022 | 6:47 AM
Share

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून (Oil Companies) इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या (Petrol and Diesel) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल,. डिझेलवरील अबकारी करात कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटरमागे साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. तेव्हापासून देशासह राज्यात पेट्रोल,. डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतररारष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price)तेजी दिसून येत आहे. आज कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 125 डॉलरवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या भावात तेजी असतानाही भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मात्र रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच राहिल्यास कच्च्या तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरात जर वाढ होतच राहिली तर भारतात देखील पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील इंधनाचे दर

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई111.3597.28
पुणे111. 3098
नाशिक111.2595.73
नागपूर111.4195.73
कोल्हापूर111.0295.54

प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये लिटर आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 106.03 रुपये इतका आहे, तर डिझेलचा रेट प्रति लिटर 92.76 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये लिटर आहे. इंधन दराबाबत या चार प्रमुख महानगरांची तुलना केल्यास सर्वात महाग पेट्रोल, डिझेल हे मुंबईमध्ये आहे. तर सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल दिल्लीमध्ये आहे.

Follow Us
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा