AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इंधनाचे दर स्थिर आहेत. गेल्या 27 दिवसांपासून भाव वाढ न झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
Image Credit source: tv9
| Updated on: May 02, 2022 | 7:36 AM
Share

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलचे नवे दर (Today petrol, diesel rates) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या 27 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे रविवारी जेट फ्यूल आणि व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. नव्या दरवाढीनुसार व्यवसायिक एलपीजी सिलिंडर 104 रुपयांनी महाग झाला आहे. तर मुंबईमध्ये एटीएफचे दर 115617.24 किलो लिटरवर पोहोचले आहेत. पेट्रोलिम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर (Petrol Price in Delhi Today) प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेल प्रति लिटर 96.67 रुपये लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर (Petrol Price in Mumbai Today) 120.51 रुपये प्रति लिटर तर एका लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 110.85 आणि 100.94 रुपये लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये तर डिझेल 99.83 रुपए प्रति लीटर आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

आज देखील पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसून, राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 105.41 रुपये आहे. पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 120.20 रुपये तर डिझेल 103.10 रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 121.13 आणि 103.79 रुपये लिटर आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा भाव 120.40 रुपये लिटर असून, डिझेल 103.73 रुपये लिटर मिळत आहे. राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये आहे, परभणीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 123.51 रुपये असून, डिझेल प्रति लिटर 106.10 रुपये आहे.

देशात महागाईचा भडका

गेल्या 27 दिवसांपासून राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र तरी देखील दैनंदीन वापराच्या वस्तूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे. खाद्य तेलापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच गोष्टींचे दर वाढले आहेत. रविवारी एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. व्यवसायिक सिलिंडर 104 रुपयांनी महाग झाला आहे. तर दुसरीकडे जेट फ्युलच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. एटीएफचे दर वाढल्याने विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे.

Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल