जगातील टॉप 10 श्रीमंत लोक कोण? अंबानी-अदानी कितव्या क्रमांकावर? वाचा…
Top 10 Richest People In World: जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सर्वजण हे बिझनेसमन आहेत. हे सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतात. आज आपण सध्या जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या 10 लोकांची माहिती आणि त्यांची संपत्ती किती आहे हे जाणून घेणार आहोत.

जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण याची चर्चा नेहमी होत असते. जगात असे काही लोक आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठी संपत्ती कमावली आहे. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सर्वजण हे बिझनेसमन आहेत. हे सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतात. आज आपण सध्या जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या 10 लोकांची माहिती आणि त्यांची संपत्ती किती आहे हे जाणून घेणार आहोत.
10. वॉरेन बफेट
वॉरेन बफेट हे जगातील 10 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. वॉरेन बफेट यांनी बर्कशायर हॅथवे या कंपनीची स्थापने केली आहे. ही कंपनी अनेक उद्योगांमध्ये गुंतवणूक करते. बफेट यांची एकूण संपत्ती अंदाजे 142 अब्ज डॉलर्स आहे.
9. जेन्सन हुआंग
जेन्सन हुआंगने ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (GPUs) आणि AI मध्ये आघाडीवर असलेल्या NVIDIA चे सह-संस्थापक आहेत. गेमिंग, AI आणि ऑटोमॅटिक वाहनांसाठी NVIDIA प्रसिद्ध आहे. हुआंग यांची एकूण संपत्ती 154 अब्ज डॉलर्स आहे.
8. बर्नार्ड अर्नॉल्ट
बर्नार्ड अर्नॉल्ट हे LVMH चे सीईओ आहेत, ते लुई व्हिटॉन, डायर आणि मोएट आणि चँडन या लक्झरी वस्तूंच्या कंपन्यांचे नेतृत्व करतात. त्यांची एकूण संपत्ती 154 अब्ज डॉलर्स आहे.
7. स्टीव्ह बाल्मर
मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात नाव कंमवल्यानंतर आता क्लिपर्स बास्केटबॉल संघात गुंतवणू केली आहे. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. त्यांची एकूण संपत्ती 155 अब्ज डॉलर्स आहे.
6. सेर्गेई ब्रिन
गुगलचे सह-संस्थापक सेर्गेई ब्रिन यांनी कंपनीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते अल्फाबेटचे सदस्य आहेत. सध्या त्यांची एकूण संपत्ती 193 अब्ज डॉलर्स आहे.
5. लॅरी पेज
लॅरी पेज यांनी सेर्गेई ब्रिनसोबत गुगलची स्थापना केली होती. त्यांनी ऑटोमॅटिक वाहने आणि ऊर्जा यासारख्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्यांची एकूण संपत्ती 208 अब्ज डॉलर्स आहे.
4. जेफ बेझोस
जेफ बेझोस यांनी Amazon ची स्थापना करत ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवली. ही कंपनी जगभरातील अनेक देशांमध्ये सेवा देते. बेझोस हे ब्लू ओरिजिन या अवकाश संशोधन कंपनीचे मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 243 डॉलर्स अब्ज आहे.
3. मार्क झुकरबर्ग
मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली होती. त्यांच्यामळे सोशल नेटवर्किंगमध्ये क्रांती झाली. सध्या त्यांची एकूण संपत्ती 261 अब्ज डॉलर्स आहे.
2. लॅरी एलिसन
ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन हे जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आहेत. क्लाउड कॉम्प्युटिंगमधील गुंतवणूक आणि टेस्लामधील हिस्सेदारीने त्यांच्या संपत्तीत सतत वाढ होत आहे. सध्या त्यांची संपत्ती 355 अब्ज डॉलर्स आहे.
1. एलोन मस्क
एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते टेस्ला, स्पेसएक्स आणि न्यूरालिंकसह इतरही कंपन्यांचे मालक आहेत. मस्क यांची एकूण संपत्ती 485 डॉलर्स अब्ज आहे. दरम्यान, सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी हे 18 व्या क्रमांकावर आणि गौतम अदानी हे 24 व्या क्रमांकावर आहेत.
