Bank Holidays in January 2021 | जानेवारीचा अर्धा महिना सुट्ट्यांचा, 14 दिवस बँका बंद!

जानेवारी महिन्यात देशातली बँकांना तब्बल 14 दिवस सुट्या (bank holidays) आहेत. (january bank holidays information)

 • Updated On - 4:20 pm, Wed, 30 December 20 Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम Follow us -
Bank Holidays in January 2021 | जानेवारीचा अर्धा महिना सुट्ट्यांचा, 14 दिवस बँका बंद!
Bank holiday list

मुंबई : नव्या वर्षाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज आहे. या वर्षात अनेकांनी नवनवे संकल्प केले असतील. तसेच, आगामी महिन्यात काय काय काम करायचे आहेत, याची यादीदेखील तुम्ही केली असेल. मात्र, येणाऱ्या नव्या वर्षाच्या जानेवारी महिन्यात तुमचे बँकेत काही महत्तावाचे काम असेल तर तुम्ही सतर्क व्हायला हवं. कारण जानेवारी महिन्यात देशातली बँकांना तब्बल 14 दिवस सुट्या (bank holidays) आहेत. म्हणजेच जवळपास अर्धा महिना देशातील बँका बंद असतील. त्यामुळे तुम्ही बँकेतील सगळे काम आटोपण्याच्या दिशेने पाउलं टाकायला हवीत. (total bank holidays in january 2021 detailed information)

भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. या लिस्टप्रमाणे जानेवारीमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद असतील. असे असले तरी देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांचे स्वरुप वेगळे असेल. तेथील स्थानिक सण, उत्सवानुसार सुट्यांच्या संख्येत बदल होऊ शकतो. मात्र, आरबीआयने जाहीर केलेल्या सुट्ट्या या बहुतांश राज्यामध्ये सारख्याच आहेत. त्यामध्ये जास्त फरक नाही.

दोन प्रकारच्या सुट्ट्या

रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या लिस्टनुसार देशातील बँका बंद असतात. या सुट्या दोन प्रकारच्या आहेत. पहिल्या प्रकारात महिन्याच्या प्रत्येक रविवारी आणि दुसऱ्या शनिवारी बँकेला सुट्टी असेल. तर सुट्ट्यांच्या दुसऱ्या प्रकारात राज्यातील स्थानिक सण आणि उत्सवानुसार असतील.

या दिवशी देशातील सर्व बँका बंद

 • 1 जानेवारी : नव्या वर्षाची सुट्टी
 • 3 जानेवारी : रविवार
 • 9 जानेवारी : दुसरा शनिवार
 • 10 जानेवारी : रविवार
 • 17 जानेवारी : रविवार
 • 23 जनवरी: चौथे शनिवार
 • 24 जानेवारी : रविवार
 • 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन
 • 31 जानेवारी : रविवार

स्थानिक सण उत्सवानुसार सुट्ट्या

 • 2 जानेवारी : अनेक राज्यांमध्ये या दिवशीसुद्धा नवीन वर्षानिमित्त सुट्टी असते
 • 14 जानेवारी : मकर संक्रांत, पोंगल आणि माघी संक्रांत
 • 15 जानेवारी : तिरुवल्लुवर दिवस, माघ बिहू आणि तुसू पूजा
 • 16 जानेवारी : उझावर थिरुनल
 • 23 जानेवारी : नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती, तसेच चौथा शनिवार
 • 25 जानेवारी : इमोइनू इरतपा सण
 • 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिवस

संबंधित बातम्या :

‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक करा; हमखास पैसे होतील दुप्पट

SBIची खातेदारांना मोठी भेट, ITR फाईल करा एकदम मोफत!

तब्बल 60 हजार कोटींनी गुंतवणूकदार झाले मालामाल, ‘या’ आहेत टॉपच्या कंपन्या

(total bank holidays in january 2021 detailed information)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI