नवी दिल्ली : कोविड प्रकोपामुळे अर्थचक्राची गती मंदावली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अद्यापही उद्योगव्यवस्थेची घडी सुरळीत बसलेली नाही. तसेच स्थानिक बाजारपेठा कोविडच्या आर्थिक धक्क्यांतून सावरलेल्या नाहीत. दरम्यान, कोविडचा सर्वाधिक फटका रोजगार निर्मितीच्या क्षमतेवर बसला आहे. गेल्या महिन्यांत बेरोजगारीचा दर 7.9 टक्क्यांवर पोहोचला होता. तब्बल 5.3 कोटी नागरिक बेरोजगार (Unemployment Rate) असल्याचे आकडेवारीतून दिसून आले होते. गेल्या पाच महिन्यांतील सर्वोच्च आकडा ठरला आहे. ऑगस्ट 2021 नंतर देशात हातांना काम नसणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत दिवसागणिक भर पडत गेली. दरम्यान, बेरोजगारीच्या आकड्यातून वास्तव चित्रण समोर येत नाही. आकड्यांच्या पलीकडची बेरोजगारी समजावून घेण्यासाठी बेरोजगारीची व्याख्या ते आकडेवारी पद्धत समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.