Wellness Forever ने सेबीकडे सार्वजनिक ऑफरसाठी केला अर्ज, अदर पूनावाला कंपनीत गुंतवणूक

वेलनेस फॉरएव्हर मेडिकेअरने सांगितले की, ते आयपीओसाठी 400 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करतील. तसेच IPO मध्ये 1.6 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल (OFS) असेल. आयपीओमधून उभारलेल्या निधीपैकी कंपनी नवीन आउटलेट उघडण्यासाठी आणि भांडवली खर्चासाठी 70.20 कोटी रुपये वापरेल.

Wellness Forever ने सेबीकडे सार्वजनिक ऑफरसाठी केला अर्ज, अदर पूनावाला कंपनीत गुंतवणूक
अदर पुनावाला, सीईओ, सिरम
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 7:44 AM

नवी दिल्ली : रिटेल फार्मसी चेन Wellness Forever मेडिकेअरने सार्वजनिक ऑफरसाठी अर्ज भांडवली बाजार नियामक सेबीकडे सादर केलाय. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ अदार पूनावाला यांनी गुंतवणूक केलेली कंपनी आयपीओद्वारे 1,600 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. वेलनेस फॉरएव्हर ही सेबीकडे ड्राफ्ट रेट हियरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) सादर करणारी दुसरी रिटेल फार्मसी चेन आहे. यापूर्वी हैदराबादस्थित मेडप्लसने ऑगस्ट 2021 मध्ये आयपीओसाठी कागदपत्रे सादर केली होती.

400 कोटी नवीन इक्विटी शेअर्स जारी करणार

वेलनेस फॉरएव्हर मेडिकेअरने सांगितले की, ते आयपीओसाठी 400 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करतील. तसेच IPO मध्ये 1.6 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल (OFS) असेल. आयपीओमधून उभारलेल्या निधीपैकी कंपनी नवीन आउटलेट उघडण्यासाठी आणि भांडवली खर्चासाठी 70.20 कोटी रुपये वापरेल. त्याचबरोबर कर्जाची परतफेड करण्यासाठी 100 कोटी रुपये आणि कार्यरत भांडवलाची पूर्तता करण्यासाठी 121.90 कोटी रुपये वापरले जातील.

2021 आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न वाढले

अदर पूनावाला यांनी गुंतवलेले वेलनेस फॉरएव्हर मेडिकेअर 2008 मध्ये अशरफ बिरान, गुलशन बख्तियानी आणि मोहित चव्हाण यांनी मुंबईत सुरू केले. ही पश्चिम भारतातील अग्रगण्य वेलनेस नेटवर्क साखळी आहे. स्टोअरच्या संख्येच्या बाबतीत ही तिसरी सर्वात मोठी साखळी आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये त्याचे उत्पन्न 924.02 कोटी रुपये होते, जे आर्थिक वर्ष 2020 मध्ये 863.25 कोटी रुपये होते.

कोण किती शेअर्सच्या विक्रीची ऑफर देणार?

वेलनेस फॉरएव्हरचे 23 शहरांमध्ये 234 स्टोअर आहेत. यामध्ये सुमारे 4600 लोक काम करतात. कंपनी सुमारे 67 लाख ग्राहकांना आपल्या सेवा पुरवते. बिरान आणि बख्तियानी आयपीओसाठी त्यांचे 7.2 लाख शेअर्स ऑफर करत आहेत, तर चव्हाण 1.20 लाख शेअर्सच्या विक्रीसाठी ऑफर करत आहेत. याशिवाय इतर भागधारकांकडून 144.85 लाख शेअर्स ऑफर केले जातील.

संबंधित बातम्या

मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक, ‘या’ गाड्या होणार प्रभावित

…तर आता रेल्वे त्यांच्या 94 शाळा बंद करणार, जाणून घ्या योजना काय?

Wellness Forever has applied to SEBI for a public offer, investing in another Poonawala company

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.