AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर IAS किंवा IPS साठी कशाआधारे निवड होते, काय असतो फॉर्म्युला

युपीएससी ही भारतातील अवघड परीक्षेपैकी एक परीक्षा मानली जाते. या परीक्षेला देशभरातून हजारो विद्यार्थी बसतात. मात्र आयएएस आणि आयपीएस हे कॅडर नेमके कसे निवडले जाते ते पाहूया...

युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर IAS किंवा IPS साठी कशाआधारे निवड होते, काय असतो फॉर्म्युला
upsc answer sheet
| Updated on: May 25, 2023 | 12:16 PM
Share

मुंबई : युपीएससी 2022 परीक्षेचे अंतिम निकाल आले आहेत. युपीएससी परीक्षेत इशिता किशोर हीने पहीला क्रमांक काढला आहे. तर टॉप 20 मध्ये मुलींनी बाजी मारली आहे. पाचव्या क्रमांकावर आलेल्या मयूर हजारिका याने आयएफएस बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युपीएससीची परीक्षा देशात सर्वात अवघड मानली जाते. कोणाला आयएएस बनायचे आहे तर कोणाला आयपीएस. परंतू युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उमेदवारांची आयएएस आणि आयएएस कॅडरसाठी कशा प्रकारे निवड केली जाते ते पाहूयात…

असा निश्चित होतो कॅडर

युपीएससी परीक्षा पास झाल्यावर एकूण 24 सिव्हील सर्व्हीसेसमध्ये उमेदवार जाऊ शकतात. या सर्व्हीसेस दोन कॅटगरीत वाटल्या जातात. पहीली आहे ऑल इंडीया सर्व्हीसेस. यात सेवेत आयएएस ( इंडीयन अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हीसेस ) आणि आयपीएस ( इंडीयन पोलीस सर्व्हीसेस ) देखील मोडते. यात ज्यांची निवड होते त्यांना राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे कॅडर दिले जाते. नंतर दुसऱ्या क्रमांकावर सेंट्रस सर्व्हीसेस, यात ग्रुप ए आणि ग्रुप बी सर्व्हीसेसचा समावेश होतो.

काय असते ग्रुप ए आणि बी सर्व्हीस

ग्रुप ए सर्व्हीसमध्ये इंडीयन फॉरेन सर्व्हीस ( IFS) , इंडीयन सिव्हील अकाऊंट सर्व्हीस, इंडीयन रेव्हेन्यू सर्व्हीस ( इन्कम टॅक्सची पोस्ट ), इंडीयन रेल्वे सर्व्हीस ( IRTS आणि IRPS ) आणि इंडीयन इन्फॉर्मेशन सर्व्हीस ( IIS ) सारख्या सेवा आहेत. तसेच ग्रुप बी मध्ये आर्म्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स सिव्हील सर्व्हीस, पुडुचेरी सिव्हील सर्व्हीस, दिल्ली अॅण्ड अंदमान निकोबार आयलॅंड सिव्हील आणि पोलीस सर्व्हीस सारख्या सेवांचा समावेश असतो.

सिव्हील सर्व्हीसचा प्रवास असा आहे

1) पूर्व परीक्षा, 2) मुख्य परीक्षा आणि 3) मुलाखत अशा तीन टप्प्यात युपीएससीची परीक्षा देता येते. ग्रॅज्युएटनंतर युपीएससीची पूर्व परीक्षा देता येते. पहिल्या पेपर आधारे कटऑफ बनते. दुसरा पेपर सीसॅट क्वालीफाईंग पेपर असतो. यात पास होण्यासाठी किमान 33 टक्के मार्क हवे असतात. नंतर कटऑफ नुसार निवड झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला निवडले जातात. हे दोन्ही पेपर उत्तीर्ण होणे गरजेचे असते. नंतर मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणे फारच अवघड असते.

डीएएफ फॉर्म म्हणजे काय?

मुख्य परीक्षेचा रिझल्ट आल्यावर एक फॉर्म भरावा लागतो त्यातून पर्सनालिटी टेस्ट होते. त्यालाच डीटेल्स एप्लिकेशन फॉर्म म्हणतात. यात तुम्ही भरलेल्या माहीती आधारे इंटरव्यूह पॅनल प्रश्न विचारते. यात तुम्हाला तुमच्या हॉबी, बॅकग्राऊंड आणि शिक्षणाबद्दल प्रश्न विचारले जातात. मुलाखत यशस्वी केल्यानंतर तेच गुण ग्राह्य धरुन रिझल्ट केला जातो. त्याआधारे रॅकींग तयार केली जाते.

प्रेफरन्सलाही दिले जाते महत्व

रॅंकींग वॅकन्सी आधारे होते. वर्षभरात एखाद्या पोस्टसाठी जेवढ्या जागा निघतात. जनरल, एसी, एसटी, ओबीसी, इडब्ल्यूएस वर्गवारीसाठी जेवढ्या लोकांनी ऑप्शन निवडला आहे त्याआधारे रॅंक तयार केली जाते. तसेच तुम्ही मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना पहिला प्रेफरन्स आयएएस, आयएफएस कि आयपीएसला दिला आहे त्याचाही विचार केला जातो. त्यानंतर मेरिट लीस्ट काढली जाते. ज्यांना जास्त मार्क मिळतात त्यांनी जर आयएएस किंवा आयएफएस ला प्राधान्य दिले असेल तर त्यांना तीच रॅंक मिळते. त्यानंतर मार्काच्या आधारे पुढील पोस्ट दिली जाते.

असा आहे फॉर्म्युला

जर 100 जागा असतील आणि त्यात आयएएसकरीता 30 जागा रिक्त असतील तर टॉप 30 लोकांची निवड आयएएस करीता होईल. मात्र त्यातील काही लोकांनी आयपीएस किंवा आयआरएस पर्याय निवडला असेल तर मेरिटमध्ये थोडे मागे असूनही जर आयएएसचा पर्याय निवडला असेल तर त्यांना संधी मिळेल. त्यामुळे कमी मार्कवाल्यांनाही वरच्या सेवेत संधी मिळेल.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.