दिवाळी बोनसची ‘इथे’ करा गुंतवणूक; मिळवा अधिक फायदा

वर्षभर कर्मचारी आपल्या दिवाळी बोनसची वाट पाहात असतात. प्रत्येकाला आपले वेतन आणि इतर संबंधित गोष्टींच्या आधारावर बोनस मिळतो. मात्र यातील अनेकजण बोनसच्या रुपात मिळालेले पैसे हे खरेदी करण्यासाठी खर्च करतात. परंतु  हेच पैसे जर दरवर्षी आपण वाचवले आणि योग्य त्या ठिकाणी गुंतवले तर काही वर्षानंतर त्याचा मोठा मोबदला आपल्याला मिळू शकतो.

दिवाळी बोनसची 'इथे' करा गुंतवणूक; मिळवा अधिक फायदा
FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्ही बँका किंवा वित्तीय संस्थांद्वारे दिलेली कोणती मुदत तुमची उद्दिष्टे पूर्ण करतात हे नीट तपासावे. पैसे गुंतवण्यापूर्वी, एखाद्याने योजनेचा कालावधी आणि आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार विविध संस्थांच्या परताव्याच्या व्याजदराची तुलना केली पाहिजे.

नवी दिल्ली – वर्षभर कर्मचारी आपल्या दिवाळी बोनसची वाट पाहात असतात. प्रत्येकाला आपले वेतन आणि इतर संबंधित गोष्टींच्या आधारावर बोनस मिळतो. मात्र यातील अनेकजण बोनसच्या रुपात मिळालेले पैसे हे खरेदी करण्यासाठी खर्च करतात. परंतु  हेच पैसे जर दरवर्षी आपण वाचवले आणि योग्य त्या ठिकाणी गुंतवले तर काही वर्षानंतर त्याचा मोठा मोबदला आपल्याला मिळू शकतो. यातून मिळणारी रक्कम  मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न आशा महत्त्वपूर्ण कामांसाठी आपल्याला उपयोगी पडू शकते. हातात पैसा असल्याने आपल्याला कर्ज घेण्याची देखील आवश्यकता राहाणार नाही. त्यामुळेच खर्चाचे प्रमाण कमी करून, बचत वाढवण्याचा सल्ला अनेकांकडून दिला जातो. पैसे कैसे गुंतवावेत कुठे गुंतवावेत? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

फिक्स्ड डिपॉझिट 

तुम्हाला जर कोणतीही जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी फिक्स्ड जिपॉझिट हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. अनेक बँका या फिक्स्ड डिपॉझिटवर व्याजाच्या रुपयात चांगला परतावा देतात. साधाराण पणे बँकांकडून 5 ते 6.5 टक्के व्याज गुंतवणूकदाराला दिले जाते. तुमची जर बँकेत एफडी असेल तर तुम्ही ती तारण ठेवून बँकेकडून लोन देखील घेऊ शकता. एफडी करण्यापूर्वी विविध बँकेचे व्याजदर जाणून घेणे फायदेशीर ठरते.

म्युच्युअल फंड

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते जर आपल्या भांडवली बाजाराचा चांगला अभ्यास असेल आणि जोखीम स्वीकारण्याची तयारी असेल, तर म्युच्युअल फंड हा देखील गुंतवणुकीचा आपल्यासाठी सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो. म्युच्युअल फंडमध्ये जोखमी अधिक असते, तसेच बाजार देखील अस्थिर असतो. मात्र यातून एफडीपेक्षा अधिक चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. गुंतवणूकदार जर लाँग टर्म गुंतवणुकीचा विचार करत असेल तर त्याच्यासाठी म्युच्युअल फंड हा अधिक चांगला पर्याय ठरू शकतो.

सोने आणि गोल्ड बॉन्ड 

भारतामध्ये असे अनेक सन, उत्सव असतात त्या मुहुर्तावर सोन खरेदी करणे शुभ मानले जाते, ज्यामध्ये धनत्रयोदशी, अक्षय तृतीया अशा उत्सवांचा समावेश आहे. या काळात आपण सोन्यामध्ये देखील गुंतवणूक करू शकतात.  मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरामध्ये घट होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांचा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याला आणखी एक पर्याय म्हणजे आपण गोल्ड बॉन्डमध्ये देखील गुंतवणूक करू शकतो. आपण गरजेनुसार आपण ते विकू देखील शकतो.

सबंधित बातम्या 

सुवर्ण कर्ज माफ करत या राज्यातील सरकारने जनतेला दिले दिवाळीचे मोठे गिफ्ट!

तब्बल 14 वर्षांनी होणार आगपेटीच्या किमतीत वाढ; जाणून घ्या का वाढवावे लागले दर?

पॉलिसी घेताना ही चूक तर केली नाही ना? नाहीतर फुटकी कवडीही मिळणार नाही!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI