AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratan Tata Will: रतन टाटा यांनी गुंतवणूक केलेल्या ओला, अपस्टॉक्स इतर 18 स्टार्टअप्समधील पैसा कोणाला मिळणार? मृत्यूपत्रातून खुलासा

Ratan Tata Investment: रतन टाटा यांनी 2022 मध्ये 'रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन' तयार केले होते. ही सामाजिक संस्था म्हणून काम करते. रतन टाटा यांनी या फाउंडेशनची निर्मिती टाटा कुटुंबाच्या परंपरेनुसार केली आहे. यापूर्वी देखील टाटा कुटुंबातील सदस्यांनी त्यांची मालमत्ता फाउंडेशनला दान केली होती.

Ratan Tata Will: रतन टाटा यांनी गुंतवणूक केलेल्या ओला, अपस्टॉक्स इतर 18 स्टार्टअप्समधील पैसा कोणाला मिळणार? मृत्यूपत्रातून खुलासा
Ratan Tata
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 26, 2024 | 9:59 AM
Share

Ratan Tata Investment: देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे मुंबईत 9 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांची असलेल्या संपत्ती आणि गुंतवणुकीसंदर्भात रतन टाटा यांनी मृत्यूपत्र करुन ठेवले होते. त्यांची संपत्ती 10 हजार कोटींहून अधिक आहे. ही संपत्ती कोणाला मिळणार? या संपत्तीचा वारसदार कोण? त्यांनी गुंतवणूक केलेल्या स्टॉर्टअपमधील निधीचे काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहे. ओला, ओला इलेक्ट्रिक, अपस्टॉक्स, क्योरफिट आणि अरबन कंपनी या सारख्या स्टार्टअपमध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली होती.

18 स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक

रतन टाटा यांनी त्यांच्या परिवाराचे सदस्यांपासून त्यांचा आवडता श्वान, घरातील कर्मचारी, त्यांच्या सामाजिक संस्था सर्वांचा उल्लेख मृत्यूपत्रात केला आहे. त्यांचा मित्र शंतनू नायडूचाही उल्लेख या मृत्यूपत्रात आहे. रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात म्हटले आहे की, आरएनटी असोसिएट्स आणि एएनएटी सल्लागारांमार्फत स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. ते लिक्विडेट केले जातील, म्हणजेच या कंपन्यांमधील त्यांची गुंतवणूक किंवा शेअर होल्डिंग्स रद्द केले जातील.

रतन टाटा यांनी वैयक्तिकरित्या 18 स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली होती. यामध्ये ओला, ओला इलेक्ट्रिक, पेटीएम, स्नॅपडील, ट्रॅक्सन, फर्स्ट क्राय, कार देखो, कॅश करो, क्युअर फिट, ब्लू स्टोन, अपस्टॉक्स, अर्बन कंपनी, अर्बन लॅडर आणि मोग्लिक्स या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांमधून गुंतवणूक काढून ती त्यांच्या ‘रतन टाटा एन्डॉमेंट फाऊंडेशन’ (आरटीईएफ) ला देण्यात येणार आहे.

टाटा सन्सचे सर्वाधिक शेअर

रतन टाटा यांनी 2022 मध्ये ‘रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन’ तयार केले होते. ही सामाजिक संस्था म्हणून काम करते. रतन टाटा यांनी या फाउंडेशनची निर्मिती टाटा कुटुंबाच्या परंपरेनुसार केली आहे. यापूर्वी देखील टाटा कुटुंबातील सदस्यांनी त्यांची मालमत्ता फाउंडेशनला दान केली होती. यामध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट यांचाही समावेश आहे. या फाउंडेशनकडे टाटा सन्सचे सर्वाधिक शेअर आहे. टाटा ट्रस्ट संपूर्ण ग्रुपचा मालक आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा