AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepika Padukone: दीपिका पादुकोणने ब्रेस्ट पंपच्या आवाजाला म्हटलं ‘हाँटेड हाऊस’; व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया

Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादुकोण नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली. देवी पादुकोण सिंह असं त्यांच्या दुसऱ्या मुलीचं नाव आहे. दीपिकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Deepika Padukone: दीपिका पादुकोणने ब्रेस्ट पंपच्या आवाजाला म्हटलं 'हाँटेड हाऊस'; व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया
Deepika PadukoneImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 31, 2026 | 11:06 AM
Share

Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर दीपिका अनेकदा सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आयुष्यातील मजेशीर अनुभव शेअर करताना दिसते. आता तिने ब्रेस्ट पंपच्या आवाजाबद्दल केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये दीपिकाने ब्रेस्ट पंपच्या आवाजाची तुलना थेट भुताटकीच्या घरातील आवाजाशी केली आहे. तिच्या या विनोदी प्रतिक्रियेने चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं असून, मातृत्वातील एका खास अनुभवाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

ब्रेस्ट पंपच्या आवाजावर दीपिकाची भन्नाट प्रतिक्रिया

दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ब्रेस्ट पंपच्या आवाजाचा उल्लेख करत एक मजेशीर पोस्ट शेअर केली. ब्रेस्ट पंप वापरताना येणारा आवाज एखाद्या भुताटकीच्या घरात ऐकू येणाऱ्या आवाजासारखा असल्याचं तिने म्हटलं. आई झाल्यानंतर अनेक महिलांना ब्रेस्ट पंपचा वापर करावा लागतो. मात्र, या उपकरणाच्या आवाजाची अशी भन्नाट तुलना करण्याची कल्पना दीपिकाने मांडल्यामुळे तिची पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. दीपिकाने या पोस्टमधून मातृत्वातील अनुभवांबद्दलचा आपला हलकाफुलका दृष्टिकोन दाखवला आहे.

दीपिकाची पोस्ट-

आई झाल्यानंतर आयुष्यात अनेक बदल होतात. त्यातील काही अनुभव आनंददायी असतात, तर काही अनुभव थोडे विचित्र आणि मजेशीरही असतात. दीपिकाने आपल्या पोस्टमधून अशाच एका अनुभवाला विनोदाची जोड दिली आहे. दीपिकाने काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती सार्वजनिक केलेली नाही. मात्र, वेळोवेळी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून ते आपल्या पालकत्वाच्या प्रवासातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

दीपिकाने 14 नोव्हेंबर 2018 रोजी रणवीर सिंहशी लग्न केलं. लग्नाच्या सहा वर्षांनंतर सप्टेंबर 2024 मध्ये दीपिकाने मुलीला जन्म दिला. या मुलीचं नाव त्यांनी दुआ असं ठेवलं. त्यानंतर 19 सप्टेंबर 2026 रोजी दीपिकाच्या घरी दुसऱ्यांच्या मुलीचं आगमन झालं. रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या दुसऱ्या मुलीचं नाव देवी पादुकोण सिंह असं ठेवलं.

Follow Us
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू