AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनम वांगचुक यांनी अभिजीत दीपकेंना सुनावलं, थेट व्हिडीओ शेअर करत… आपसातच जुंपली?

जंतरमंतर येथे तिरंगा फडकवल्याने अटक झालेल्या अभिजीत दीपके आणि कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांनी 'पीस बाँड'वर सही केल्याने सोनम वांगचुक यांनी टीका केली आहे. वांगचुक यांनी आपला जुना व्हिडिओ शेअर करत, लोकांना भल्यासाठी तुरुंगात जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्वतःच्या नजरकैदेचा अनुभव सांगून, आर्टिकल 19 चे अधिकार सोडण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे.

सोनम वांगचुक यांनी अभिजीत दीपकेंना सुनावलं, थेट व्हिडीओ शेअर करत... आपसातच जुंपली?
Sonam WangchukImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 11:07 AM
Share

जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. सीजेपीचे सौरव दास, आशुतोष रांका आणि अभिजीत दीपके यांना 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलका आणि पीस बाँडवर सही केल्यानंतर सोडून देण्यात आले होते. मात्र, पीस बॉन्डच्या मुद्द्यावरून पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपला एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर त्यांनी एक कॅप्शन दिलं आहे. सर्वांना एकदा तुरुंगात गेलं पाहिजे. गुन्ह्यासाठी नव्हे तर लोकांच्या भल्यासाठी तरी तुरुंगात गेलं पाहिजे, असा टोला सोनम वांगचुक यांनी लगावला आहे.

चार वर्षापूर्वी मलाही पीस बॉन्ड भरण्याची वेळ आली होती. मला नजरकैदेत ठेवलं होतं. दीर्घकाळ तुरुंगात डांबण्याची धमकी मला देण्यात आली होती. त्यावेळी मी एक व्हिडीओ तयार केला होता. तोच व्हिडीओ मी शेअर करत आहे, असं सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे. वांगचुक यांनी हा व्हिडीओ शेअर करून दीपके यांच्यासह कॉकरोचच्या नेत्यांची कानउघाडणी केल्याचं सांगितलं जात आहे.

काय घातली बंधनं?

27 जानेवारी 2023चा हा व्हिडीओ आहे. वांगचुक यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात, आज जेव्हा मी बेकायदेशीर नजरकैद आणि एलजी साहेबांच्या मनमानी विरोधात बोलायला सुरुवात केली. तेव्हा एका अधिकाऱ्याने माझ्यासमोर एक कागद धरला. मला म्हणाले, हा पीस बाँड आहे. सार्वजनिक सभांमध्ये सामील होणार नाही आणि भाषण देणार नाही, असं यात म्हटलं आहे. सध्याच्या परिस्थितीशी निगडीत कोणत्याही कार्यक्रमात, आंदोलनात भाग घेणार नाही. जर मी असं केलं तर…

टायमिंगवरून चर्चा

मला माझ्या हातूनच आर्टिकल 19 च्या अंतर्गत येणारे अधिकार त्यांना द्यायचे होते. 50 हजार रुपये भरायचे होते. पैसे नाही भरले तर काय होईल? असं मी विचारलं. मी म्हटलं, जो व्यक्ती मरायला घाबरत नाही. तो डिटेन्शनला कसा घाबरेल? तुम्ही मला नजरकैदेत ठेवलं आहे. अनेक पोलीस अधिकाऱ्यांना तैनात केलं आहे. अनेक पोलीस मायनस 10 डिग्री सेल्सिअसमध्ये चकरा मारत आहेत. त्यांना ना तंबू ना टेंट दिलाय, असं वांगचूक यांनी या व्हिडिओतून म्हटलं आहे. वांगचुक यांनी आताच हा व्हिडीओ शेअर केल्याने त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. वांगचुक यांच्या टायमिंगवरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. अभिजीत दीपके आणि त्यांच्या टीमला वांगचुक यांनी सुनावल्याचं सांगितलं जात आहे.

Follow Us
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू