Bisleri : पाणी पेटले रे भावा! ‘Bisleri’ च्या कहाणीत पुन्हा ट्विस्ट, 7000 कोटींचा कारभारी कोण

Bisleri : बिसलेरीतील वादाला तोटा नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे लोकांची तहान भागवणाऱ्या बिसलेरीचे पाणी पुन्हा पेटले आहे. टाटा कंपनीसोबत करार फिस्कटल्यानंतर आता घरातील वाद चव्हाट्यावर आला आहे. काय आहे हा नवीन वाद, त्यामुळे पाणी का पेटले आहे? काय घडत आहेत बिसलेरीमध्ये घडामोडी

Bisleri : पाणी पेटले रे भावा! 'Bisleri' च्या कहाणीत पुन्हा ट्विस्ट, 7000 कोटींचा कारभारी कोण
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 10:03 AM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बाटलीबंद पाणी विक्री करणारी कंपनी बिसलेरी (Bisleri) मागील वादाची मालिका सुरुच आहे. बिसलेरीतील वादाला तोटा नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे लोकांची तहान भागवणाऱ्या बिसलेरीचे पाणी पुन्हा पेटले आहे. टाटा कंपनीसोबत करार (Deal With Tata) फिस्कटल्यानंतर आता घरातील वाद चव्हाट्यावर आला आहे. या कंपनीविषयी बाजारात प्रत्येक दिवशी एक अपडेट समोर येत आहे. या वादावर कंपनीने लवकर तोडगा काढला नाही तर प्रतिस्पर्धी कंपन्या बिसलेरीचा बाजारातील वाटा कमी करतील असा दावा तज्ज्ञ वर्तवित आहेत. काय आहे हा नवीन वाद, त्यामुळे पाणी का पेटले आहे? काय घडत आहेत बिसलेरीमध्ये घडामोडी

वादाची मालिका

यापूर्वी मालक रमेश चौहान (Ramesh Chauhan) उत्तराधिकारी नसल्याने कंपनीची विक्री करणार होते. त्यानंतर त्यांनी टाटा समूहाला (Tata Group) ही कंपनी विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चर्चेच्या तीन-चार फेऱ्या ही झाल्या. टाटा कंपनी 7000 कोटी रुपयांत ही कंपनी खरेदी करणार असल्याचे समोर आले. पण पुन्हा माशी शिंकली. ही डील पूर्ण झाली नाही.

हे सुद्धा वाचा

मुलगी सांभाळणार कारभार

टाटा समूहाने खरेदी करार करण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. रमेश चौहान यांची 42 वर्षांची मुलगी जयंती चौहान (Jayanti Chauhan) कंपनीचा कारभार हाती घेणार असल्याचा दावा करण्यात आला. जयंतीने या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली. अनेक नवीन कल्पनांवर तिने काम सुरु केले. आयपीएलमध्ये दोन टीमसोबत करार झाला. डोअर-टू-डोअर करारावर भर देण्यात आला. पण आता या कहाणीत ट्विस्ट आला आहे.

बाटलीबंद मिनरल वॉटर मार्केटमध्ये बिसलेरीचा दबदबा आहे. बिसलेरीचा भारतीय बाजारात 60 टक्के वाटा आहे. बिसलेरीच्या संकेतस्थळानुसार, जयंतीलाल चौहान यांनी 1949 मध्ये सॉफ्ट ड्रिंक्स तयार करणारी पारले समूहाची स्थापना केली होती. त्यांनी 1969 मध्ये इटलीतील एका उद्योजकाकडून बिसलेरी खरेदी केली होती. सध्या कंपनी हँड सॅनिटायझरही तयार करत आहे.

मुलीसोबत नाही जमले

बिझनेस टुडेच्या एका वृत्तानुसार, बिसलेरीची कमान सांभाळण्यास जयंतीने नकार दिला आहे. वडील आणि मुलीत या मुद्यावर वाद पेटला. रिपोर्टनुसार, बिसलेरीची कमान आता जयंती ऐवजी सीईओ एंजेलो जॉर्ज (Angelo George) यांना सोपविण्यात आली आहे. वृत्तानुसार, रमेश चौहान आणि जयंती यांच्यात मतभेद वाढले आहेत. जयंती बिसलेरीचा कारभार सांभाळण्यास तयार नाही. त्यामुळे अचानक रमेश चौहान यांनी सीईओ एंजेलो जॉर्ज यांच्या खाद्यांवर कंपनीची जबाबदारी सोपवली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.