AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Story : Mukesh Ambani यांच्या या बहिणीविषयी तुम्हाला माहितीय का, लव्ह मॅरेजनंतर प्रसिद्धीपासून दूर पण..

A Love Story : मुकेश अंबानी यांच्या या बहिणीविषयी आणि तिच्या प्रेमाविषयी अनेक लोकांना माहिती नाही. या जगावेगळ्या प्रेम कहानीमध्ये व्हिलन कोणीच नव्हते, होते ते प्रेम..

Love Story : Mukesh Ambani यांच्या या बहिणीविषयी तुम्हाला माहितीय का, लव्ह मॅरेजनंतर प्रसिद्धीपासून दूर पण..
| Updated on: Feb 19, 2023 | 10:18 AM
Share

नवी दिल्ली : अंबानी (Ambani Family) म्हटले की समोर येतात ते धीरुभाई अंबानी, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नीता अंबानी आणि त्यांची मुलं. मुकेश अंबानी हे देशातील मोठे उद्योजक आणि आशियातील श्रीमतांपैकी एक आहे. धीरुभाई अंबानी यांनी रिलायन्सच (Reliance Industries) रोपटं लावलं. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. धीरुभाई अंबानी यांना चार मुले आहेत. दोन मुले आण दोन मुली. मुकेश अंबानी यांना दोन बहिणी (Mukesh Ambani Sister) आहेत. नीना आणि दीप्ती या त्या दोन बहिणी आहेत. या दोन्ही भगिणी लाईम लाईटपासून दूर आहेत. त्यामुळेच लोकांना त्यांचाविषयी फारशी माहिती नाही.

धीरुभाई अंबानी यांची मोठी मुलगी दीप्ती साळगावकर यांनी त्यांच्या अपार्टमेंटमधीलच राज ऊर्फ दत्तराज साळगावकर यांच्याशी लग्न केले. या दोघांच्या लग्नाची गोष्ट मोठी रोचक आहे. सध्या साळगावकर कुटुंब गोवेकर झाले आहेत. हे कुटंब गोव्यात राहते.  त्यांचा सर्व कारभार गोव्यातूनच चालतो. पण राज साळगावकर यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर धीरुभाई अंबांनी यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

धीरुभाई अंबानी हे कुटुंबासह 1978 मध्ये मुंबईतील उषा किरण सोसायटीत राहत होते. ते 22 व्या मजल्यावर राहत होते. तर त्याच इमारतीत वासुदेव साळगावकर यांचे कुटुंबिय 14 व्या मजल्यावर राहत होते. अंबानी आणि साळगावकर यांच्या कुटुंबियात घरोबा होता. आपलेपण होते. त्यांचे कौटुंबिक संबंध जिव्हाळ्याचे होते.

वासुदेव साळगावकर यांचा मुलगा दत्तराज साळगावकर अनिल अंबानी यांच्यापेक्षा वयाने दोन वर्षे मोठे आहेत. मुकेश अंबानी आणि त्याच्यांत घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. याच दरम्यान राज आणि दीप्ती यांच्यात मैत्री झाली. ही मैत्री पुढे प्रेमात बदलली. राज साळगावकर यांनी याविषयीचा किस्सा सांगितला आहे. त्यानुसार, त्या दोघांचा भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी अर्थातच ही गोष्ट घरच्यांपासून लपवून ठेवली नाही. त्यांनी लग्नाचा विषय घरच्यांच्या कानावर घातला. दोघांच्याही घरच्यांना त्याला विरोध केला नाही, त्यांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला.राज आणि दीप्ती यांच्या मुलांची नावे इशिता आणि विक्रम अशी आहेत. इशिताचे लग्न नीरव मोदी यांच्या भावासोबत झाले आहे. राज साळगावकर यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर धीरुभाईंनी त्यांना मार्गदर्शन केले. दीप्ती आणि राज यांचे लग्न 1983 मध्ये झाले होते.  त्यानंतर ते गोव्यात स्थायिक झालेत.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....