Groww ॲप बंद, गुंतवणूकदार भडकले, कंपनीने दिले असे उत्तर

Groww App | शेअर बाजार उघडताच आज ग्रो ॲपने गुंतवणूकदारांना निराश केले. हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म अचानक बंद झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह सुरुवातीलाच मावळला. अनेकांनी लॉगिन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना लॉगिन करता आले नाही. बाजारात काय सुरु आहे. हे गुंतवणूकदारांना कळाले नाही. त्यामुळे त्यांचा संताप झाला.

Groww ॲप बंद, गुंतवणूकदार भडकले, कंपनीने दिले असे उत्तर
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 3:24 PM

नवी दिल्ली | 23 January 2024 : ऑनलाईन ब्रोकर प्लॅटफॉर्म Groww आणि त्याच्य ग्राहकांवर अचानक संकट कोसळलं. मंगळवार हा ग्रोसाठी घातवार ठरला. हा आघात गुंतवणूकदार सहन करु शकले नाहीत. त्यांनी ग्रो या ब्रोकिंग प्लॅटफॉर्मवर संताप व्यक्त केला. इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान हे ॲप बंद झाल्याने युझर्स भडकले. बाजार सुरु होताच ही समस्या उद्भवल्याने कितीवेळ ग्राहकांना नेमकं काय होतंय याचा अंदाज येत नव्हता. त्यांना बाजारात ट्रेडच करता येत नव्हता. त्यांना ॲपवर लॉगिन होता येत नव्हते.

Groww टीमने लागलीच यावर प्रतिक्रिया दिली. तांत्रिक अडचणीमुळे ही समस्या उद्भवल्याचा दावा करण्यात आला. कंपनीने या तांत्रिक चुकीबद्दल गुंतवणूकदारांची माफी मागितली. दिलगिरी व्यक्त केली. पण सकाळच्याच सत्रात ट्रेड न करता आल्याने ग्राहकांची या प्लॅटफॉर्मवर खप्पामर्जी झाली. त्यांनी संताप व्यक्त केला. ग्रो ॲपने लागलीच ही समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. पण तोपर्यंत सोशल मीडियावर ग्राहकांनी त्यांच्या संतापाला वाट मोकळी करुन दिली होती.

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

हे सुद्धा वाचा

Groww ॲप डाऊन झाल्यानंतर युझर्सने सोशल मीडियावर या प्लॅटफॉर्मचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी ॲपवर मीम्सचा पाऊस पाडून त्यांच्या संतापाला वाट मोकळी करुन दिली. ग्रो ॲप क्रॅश अशी हॅशटॅग तयार झाली. त्यावर ग्राहकांनी त्यांना कोणत्या समस्या आल्या. काय अडचण आली आणि कंपनीचा कसा प्रतिसाद मिळाला यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. तर काहींनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले. तसेच लॉगिन करण्यात का अडचण येत आहे, याची विचारणा केली. याविषयीचे प्रश्न विचारले. तर काहींनी त्यांचा राग व्यक्त केला. काहींना ग्रो ॲपवर मीम्सचा पाऊस पाडला.

एक तास होते ॲप बंद

ग्रो ॲप जवळपास एक तास निद्रीस्त होते. त्यामुळे या ॲपवर ग्राहकांचा रोष दिसून आला. काही युझर्सने त्यांच्या जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ट्रेड लावत असतानाच मध्येच ॲप बंद झाले. त्यामुळे तो ट्रेड हुकल्याचा संताप एका युझरने व्यक्त केला. तर काहींनी जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत हे ॲप अनइन्स्टॉल करण्याचा निर्धार व्यक्त केला. यामुळे ग्रो ॲप आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.