घाऊक महागाईच्या दरात पुन्हा वाढ; अन्नधान्य, भाजीपाला सर्वच गोष्टी महागल्या

घाऊक महागाईच्या दरात पुन्हा वाढ; अन्नधान्य, भाजीपाला सर्वच गोष्टी महागल्या
महागाई दरात मोठी वाढ

देशात महागाई वाढतच चालली आहे. घाऊक महागाईच्या दरात गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 1.52 टक्क्यांची वाढ झाली आहे. ठोक महागाई 12.54  टक्क्यांवरून थेट 14.2 टक्क्यांवर पोहोचली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 14, 2021 | 1:37 PM

नवी दिल्ली : November WPI Inflation Data देशात महागाई वाढतच चालली आहे. घाऊक महागाईच्या दरात गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 1.52 टक्क्यांची वाढ झाली आहे. ठोक महागाई 12.54  टक्क्यांवरून थेट 14.2 टक्क्यांवर पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेल आणि विजेच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे महागाईवर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे पहायला मिळत आहे. सध्या महागाई गेल्या 12 वर्षांतील उच्चस्थरावर आहे. सप्टेंबरमध्ये ठोक महागाईचा दर 10.66 टक्के होता, त्यामध्ये वाढ होऊन तो ऑक्टोबरमध्ये 12.54 टक्क्यांवर पोहोचला तर नोव्हेंबरमध्ये 14.2 टक्क्यांवर पोहचला आहे.

अन्नधान्याच्या किमतीत वाढ 

मंगळवारी जाहीर झालेल्या नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार अन्न-धान्य आणि खाण्या पिण्याच्या गोष्टींमध्ये 3.06 टक्क्यांची वाढ झाली आहे. इंधन पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीमध्ये देखील वाढ होऊन महागाईचा दर 37.18 टक्क्यांवरून 39.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच भाजीपाल्याच्या ठोक किमतीमध्ये 1.68 टक्क्यांची वाढ झाली आहे. धातू आणि इतर गोष्टींचे देखील भाव वाढले आहेत. अनेक वस्तूंचा कच्चा माल वाढल्याने वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न

दरम्यान सरकारकडून महागाईवर नियंत्रण मिळवण्याच प्रयत्न सुरू आहे. भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबत बोलताना सांगितले की, केंद्र आणि आरबीआयकडून महागाईचा दर कसा नियंत्रित राहिल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या चार नोव्हेंबरला पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात करण्यात आली होती. त्यामुळे पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले. दरम्यान भविष्यात देखील महागाई नियंत्रणात आणण्याच्या दृष्ट्रीकोणातून मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात असे संकेत त्यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या 

देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले; अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका, ग्रामीण भागातील तरुणांचे रोजगाराच्या शोधात स्थलांतर

अन्न, निवारा महागला, वस्त्रांच्याही किंमती वाढणार; सर्वसामान्यांना दरवाढीचा मोठा फटका

बीडी, काडी, सिगारेट महागणार, जीएसटीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव, झळ किती बसणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें