अन्न, निवारा महागला, वस्त्रांच्याही किंमती वाढणार; सर्वसामान्यांना दरवाढीचा मोठा फटका

अन्न, निवारा महागला, वस्त्रांच्याही किंमती वाढणार; सर्वसामान्यांना दरवाढीचा मोठा फटका

टेक्सटाईल उद्योगामधील टॅक्स रिफंडची समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकार आणि जीएसटी परिषदेकडून कापड उद्योगावरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या वस्त्रद्योगावर 5 टक्के जीएसटी आकारण्यात येतो. मात्र आता त्यामध्ये वाढ करून तो 12 टक्के करण्यात येणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 14, 2021 | 12:12 PM

मुंबई : टेक्सटाईल उद्योगामधील टॅक्स रिफंडची समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकार आणि जीएसटी परिषदेकडून कापड उद्योगावरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या वस्त्रद्योगावर 5 टक्के जीएसटी आकारण्यात येतो. मात्र आता त्यामध्ये वाढ करून तो 12 टक्के करण्यात येणार आहे. जीएसटी वाढीला टेक्सटाईल क्षेत्रातील उद्योजकांकडून विरोध होत आहे. सरकारने जीएसटी थेट 5 टक्क्यावरून वाढून 12 टक्के न करता तो 8 टक्क्यांपर्यंत वाढवावा अशी मागणी करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांचा विरोध

याबाबत बोलताना कापड व्यापाऱ्यांनी सांगितले की, सरकारने महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आता कपड्यांवर थेट 12 टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. या निर्णयामुळे महसुलात वाढ होईल असा सरकारचा अंदाज आहे. मात्र जीएसटी वाढवल्याने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात टॅक्स चोरी होऊ शकते, टॅक्स चोरी झाल्यास महसूल वाढण्याऐवजी त्यामध्ये घटच होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच अन्न वस्त्र निवारा या जनतेच्या मुलभूत गरजा असून, त्यातील कपडे महागल्यास जनतेला महागाईचा सामना करावा लागू शकतो, असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

कच्चा मालही महागला

याबाबत बोलताना भारत मर्चटस चेंबरचे अध्यक्ष विजय लोहिया यांनी म्हटले आहे की, कच्च्या मालाच्या किमती आधीच गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे कपड्यांच्या किमतीमध्ये 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता पुन्हा एकदा सरकारने जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतल्यास कपड्यांचे भाव आणखी वधारणार याचा मोठा फटका हा सामान्य जनतेला आणि वस्त्रद्योगाला बसणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट होते, याचा मोठा फटका हा कापड उद्योगाला बसला आहे. त्यामुळे सध्या तरी जीएसटीमध्ये वाढ करण्यात येऊ नये.

संबंधित बातम्या 

बीडी, काडी, सिगारेट महागणार, जीएसटीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव, झळ किती बसणार?

सेमीकंडक्टरमुळे दिरंगाईचा करंट ! नवीन वर्षात तुमच्या आवडत्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची  डिलिव्हरी होणार लेट

इनकम टॅक्स रिटन भरताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा होऊ शकते नुकसान

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें