बँका का वसुल करतात मिनिमम बॅलन्स चार्ज?,या बँकेत मिनिमम बँलन्स राखण्याची गरज नाही, पाहा यादी
अलिकडेच ICICI या खाजगी बँकेने आपल्या ग्राहकांना मिनिमम बँलन्स राखण्याची अट घातली आहे. मात्र काही बँका अजिबात मिनिमम बॅलन्स अट लादत नाहीत कोणत्या आहेत त्या बँका पाहा यादी..

जर तुमचे एखाद्या सरकारी किंवा प्रायव्हेट बँकेत सेव्हींग अकाऊंट असेल तर तुम्ही मिनिमम बॅलन्स बद्दल ऐकलं असेलच. सेव्हींग अकाऊंटमध्ये ग्राहकास एकक किमान रक्कम शिल्लक ठेवावी लागते. असे केले नाही तर तुमच्याकडून चार्ज वसुल केला जातो.अलिकडेच देशातील प्रसिद्ध खाजगी बँक ICICI खूपच मिनिमम चार्जेस वरुनच चर्चेत आली आहे. परंतू बँका आपल्या ग्राहकांना किमान काही रक्कम बॅलन्स ठेवण्याची अट का घालतात ? पाहूयात…
जर तुम्ही बँकत सेव्हींग अकाऊंट उघडलेले असेल तर तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवण्यासंदर्भातला नियम माहितीच असेल. ही किमान रक्कम तुम्हाला तुमच्या सेव्हींग अकाऊंटमध्ये ठेवावीच लागते. असे केले नाही तर तुम्हा दंड देखील आकारला जाऊ शकतो. अलिकडे प्रसिद्ध खाजगी बँक ICICI ने त्यांच्या ग्राहकांना किमान ५० हजार रक्कम बँलन्स ठेवण्याचा नियम केला आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अखेर बँका अशा प्रकारचे कठोर नियम का लादतात या विषयी माहीती करुन घेऊयात…
का वसुल केला जातो Minimum Balance Charge?
आजकाल बँका अनेक प्रकारच्या सुविधा देत असतात. त्यात एटीएम, मोबाईल बँकींग आणि कस्टमर सपोर्ट देण्याचे काम करीत असतात. तसेच बँकांना आपले ऑफीस मेंटेन करायचे असते. तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन द्यायचे असते. तसेच सर्व प्रकारच्या डिजिटल सर्व्हीस सुरळीत सुरु राहण्यासाठी देखील बँकांना ही रक्कम उपयोगाची ठरत असते.त्यामुळे त्यांना मिनिमम रक्कम बँलन्स ठेवण्याचा नियम काढलेला आहे. यासाठी बँका आपल्या गरजा पूर्ततेसाठी अनेक पद्धतीचा चार्ज वसुल करतात.
दोन प्रकारचे मिनिमम बँलन्स असतात
ग्राहकांना सेव्हींग अकाऊंटवर दोन प्रकारचे मिनिमम बँलन्स मॅनेज करावे लागतात. पहिला प्रत्येक दिवशी एक बॅलन्स मेन्टेन करावा लागतो. आणि महिन्यांचा हिशेबाने देखील एक बँलन्स मेन्टेन ठेवावा लागतो.
अनेक सरकारी बँकांनी हा मिनिमम बॅलन्स हटवला आहे. ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असा या मागे इरादा आहे. यात खालील बँकांचा समावेश आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
पंजाब नॅशनल बँक
इंडियन बँक
कॅनरा बँक
बँक ऑफ बडोदा
याशिवाय अनेक प्रकारच्या प्रायव्हेट बँका मिनिमम बॅलन्स मॅनेज करण्यासाठी ग्राहकांना फोर्स करत असतात.
ग्राहकांची अडचण काय ?
आजकाल अनेक मोठ्या कंपन्या या बँकांशी करार करतात. त्याअंतर्गत त्या कर्मचाऱ्यांचे बँकेत सॅलरी अकाऊंट उघडले जाते. नंतर कंपनी बदलल्यानंतर दुसऱ्या कंपनीचे अन्य बँकेशी करार असल्याने पुन्हा नव्या बँकेत अकाऊंट उघडावे लागते. अशात मग आधीचे सॅलरी अकाऊंट बंद पडते. कारण त्या सेव्हींग अकाऊंटमध्ये मिनिमम बँलन्स राखणे कठीण होते.
