Investors : दिवाळीचा गोडवाही परदेशी गुंतवणूकदारांना थांबवू शकला नाही, शेअर बाजारातील पलायन काही थांबेना

Investors : परदेशी गुंतवणूकदारांना दिवाळीचा गोडवा काही थांबू शकला नाही.

Investors : दिवाळीचा गोडवाही परदेशी गुंतवणूकदारांना थांबवू शकला नाही, शेअर बाजारातील पलायन काही थांबेना
परदेशी पाहुण्यांना थांबविणार कोण?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 5:53 PM

नवी दिल्ली : परदेशी गुंतवणूकदारांचा (Foreign Investors) जीव काही भारतीय शेअर बाजारात रमताना दिसत नाही. दिवाळीचा गोडवाही त्यांना थांबवू शकलेला नाही. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून (Share Market) जोरदार विक्री सत्र आरंभले आहे.

परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून जवळपास 6,000 कोटी रुपये काढले आहेत. अमेरिकन डॉलर सातत्याने मजबूत होत असल्याने रुपयाचा त्यापुढे निभाव लागत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे परदेशी पाहुणे काही केल्या भारतीय बाजारात अधिक काळ थांबण्याच्या मनस्थितीत नाही.

रुपयाची सातत्याने घसरण सुरु असल्याने परदेशी गुंतवणूकदारांचे बाजारातून पलायन सुरु आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी या वर्षात, 2022 मध्ये आतापर्यंत एकूण 1.75 लाख कोटी रुपये काढले आहेत.

हे सुद्धा वाचा

कोटक सिक्योरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांच्या या भूमिकेमुळे बाजारात चढउताराचे सत्र सुरु राहील. भू-राजकीय परिस्थिती, डॉलरची मजबूत स्थिती, रुपयाची घसरण यामुळे ही स्थिती आली आहे.

जिओजित फायनानेशिअल सर्व्हिसेजचे व्ही के. विजयकुमार यांच्या मते, परदेशी गुंतवणूकदार सर्वच जमापुंजी घेऊन जातील अशी स्थिती नाही.सध्या सुरु असलेल्या विक्रीपेक्षा ते अधिक विक्री करणार नाहीत. डॉलर कमजोर झाल्यावर स्थिती पूर्ववत होईल.

आकड्यानुसार, ऑक्टोबर महिन्यात एफपीआयनी आतापर्यंत 5,992 कोटी रुपये काढले आहेत. सध्याच्या आकड्यानुसार, विक्रीचे सत्र कमी झाले आहे. पूर्वीपेक्षा आता परदेशी पाहुणे शेअर बाजारात जास्त विक्री करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सप्टेंबर महिन्यात परदेशी पाहुण्यांनी जवळपास 7,600 कोटींच्या शेअरची विक्री केली होती. त्यांनी आर्थिक, एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील शेअरची विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.