World Top Rich : किती श्रीमंत आले नी गेले, एका दशकापासून या धनकुबेरांचा जलवा कायम

World Top Rich : हे आहेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, एका दशकापासून या धनकुबेरांचा जलवा कायम आहे.. कोण आहेत हे गर्भश्रीमंत...

World Top Rich : किती श्रीमंत आले नी गेले, एका दशकापासून या धनकुबेरांचा जलवा कायम
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 6:52 PM

नवी दिल्ली : जगातील टॉप-10 अब्जाधीशांची (Top-10 Billionaires) यादीत बदल दिसतो. ही यादी नेहमी अपडेट होते. एका झटक्यात कोणी नंबर एकवर येतो. तर कोणाची संपत्ती कमी होते. आज कोणी राजा तर उद्या कोणी शिपाई अशी गंमतीशीर परिस्थिती होते. अर्थात या यादीतील सर्वच जण गर्भश्रीमंत आहेत. या यादीत सातत्याने उलटफेर होत असतो. कोणी पहिला क्रमांकावर जातो, तर कोणी त्याला पिछाडीवर टाकतो. पण गेल्या 10 वर्षांपासून या यादीत काही धनकुबेरांना कोणीच टक्कर देऊ शकले नाही. श्रीमंतीत त्यांचा रुबाब आजही कायम आहे.

असा झाला उलटफेर पहिला क्रमांक पटकावला नसला तरी त्यांची श्रीमंती अबाधित असते. बुधवारी पण या यादीत मोठा उलटफेर दिसून आला. 5.25 अब्ज डॉलरची संपत्ती घसरल्याने जगातील पहिल्या क्रमांकाचे अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांची घसरण झाली. दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत एलॉन मस्क (Elon Musk) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरेल. पण हा आनंद औट घटकेचाच ठरला. अर्नाल्ट यांनी पुन्हा पहिला क्रमांक पटकावला.

एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली. संपत्ती 192 अब्ज डॉलर झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती बुधवारी 1.98 अब्ज डॉलरची वाढ झाली. यावर्षी त्यांच्या संपत्ती 55.3 अब्ज डॉलरची भर पडली.

हे सुद्धा वाचा

1 दिवसात 11 अब्ज डॉलरचे नुकसान एकावेळी बर्नार्ड अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती एका दिवसांत 11 अब्ज डॉलरने कमी झाली. तर बुधवारी त्यांना एकूण संपत्ती 5.25 अब्ज डॉलरचा फटका बसला. आता अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती 187 अब्ज डॉलर आहे. यावर्षी त्यांच्या संपत्तीत 24.5 अब्ज डॉलरची वाढ झाली.

कार्लोस स्लिम गेल्या 10 वर्षांपासून अब्जाधीशांच्या यादीत मॅक्सिकन टेलिकम्युनिकेशन टायकून कार्लोस स्लिम (Carlos Slim) या यादीत आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्स सुरु झाल्यापासून म्हणजे 2012 पासून ते या यादीत आहेत. 65.8 अब्ज डॉलर ते टॉप-10 यादीत पहिल्या क्रमांकावर होते. ते या यादीत आजही कायम आहेत. ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 89.4 अब्ज डॉलर असून ते 11 व्या क्रमांकावर आहेत.

बिल गेट्स या यादीत मायक्रोस्फॉटचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा पण क्रमांक आहे. त्यांनी या यादीत 2013 साली झेप घेतली. सध्या बिल गेट्स या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 125 अब्ज डॉलर आहे.

लॅरी एलिसन सॉफ्टवेअर सेक्टरमधील लॅरी एलिसन हे दिग्गज अब्जाधीशांपैकी एक आहेत. ते गेल्या दहा वर्षांपासून या यादीत आहेत. त्यांचा क्रमांक मागे-पुढे होत असेल. पण ते यादीत आहेत. सध्या 118 अब्ज डॉलरसह ते या यादीत 5 व्या क्रमांकावर आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.