AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GST Exemption News | कोणत्या वस्तू जीएसटीतून वगळल्या माहिती आहे का? या सेवांवरील जीएसटी सरकारने हटवला, कुठे होईल फायदा? घ्या जाणून

GST Removed News : जीएसटी परिषदेच्या निर्णयानंतर 18 जुलैपासून अन्नधान्य आणि खाद्यन्न महाग झाले आहे. असे असले तरी सरकारने काही उत्पादने आणि सेवांवरील जीएसटी हटविला आहे. चला तर माहिती करुन घेऊ.

GST Exemption News | कोणत्या वस्तू जीएसटीतून वगळल्या माहिती आहे का? या सेवांवरील जीएसटी सरकारने हटवला, कुठे होईल फायदा? घ्या जाणून
जीएसटी चुकवल्याप्रकरणी ठाण्यातील एका कंपनीच्या तीन पार्टनर्सना अटकImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 19, 2022 | 8:16 AM
Share

GST Removed on this items | सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्यावर सोमवारपासून जादा बोजा पडला आहे. 18 जुलै 2022 पासून घरगुती वापराच्या अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी (GST On Essential Goods) लागू करण्यात आल्यामुळे फुडमॉल अथवा किराणा दुकानातून या वस्तू जादा दराने खरेदी कराव्या लागल्या. दैनंदिन वापरातील काही पॅकबंद (Packed) अन्नधान्य आणि खाद्यान्नाच्या किंमती या निर्णयाने वाढल्या आहेत. ग्राहकांना पॅकड, सीलबंद, लेबल लावलेल्या अनेक रोजच्या वापरातील वस्तूंसाठी जादा दाम (GST Rate News) द्यावे लागत आहे. या वस्तूंमध्ये दही, ताक, पनीर, पीट, सोयाबीन, मटार, गहु आणि अन्य धान्य यांच्यावर आता 5 टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. असे असले तरी सरकारने काही उत्पादने आणि सेवांवरील जीएसटी हटविला (GST Exemption) आहे. या सेवा आणि उत्पादनांसाठी ग्राहकांना यापुढे कुठलाही सेवा कर द्यावा लागणार नाही. या यादीत सर्वसामान्यांच्या फायद्याच्या किती गोष्टी आहेत याची माहिती करुन घेऊ.

याठिकाणी होणार फायदा

सरकारने प्रतिदिन 5,000 रुपयांहून अधिक भाडे असलेली रुग्णालयाच्या खोलीवर, आयसीयू वगळून जीएसटी आकारला आहे. परंतू, 5,000 रुपयापर्यंतच्या रुमवर ग्राहकांना कुठलाही सेवा कर द्यावा लागणार नाही. त्यातून जीएसटी वगळण्यात आला आहे.

प्रवेशासाठी किंवा प्रवेशासाठी पात्रता प्रमाणपत्र जारी करण्यासाठी किंवा विद्यापीठांद्वारे स्थलांतर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी आकारले जाणारे अर्ज शुल्क जीएसटीमधून मुक्त करण्यात आले आहे.

याशिवाय, तज्ज्ञ व्यक्ती कला, संस्कृती अथवा क्रीडा यांच्याशी संबंधित सशुल्क सेवा, प्रशिक्षण किंवा कोचिंगसाठी जीएसटी सूटचा दावा करू शकतील.

या सेवासह उत्पादने GST मुक्त

सरकारने अनेक उत्पादने आणि सेवांवरील जीएसटी काढून टाकण्यात आला आहे. यामध्ये

रेल्वेद्वारे वाहतूक किंवा रेल्वे उपकरणे आणि सामग्रीचे जहाज करपात्र वस्तूंचा साठा किंवा गोदाम (नट, मसाले, कोपरा, गूळ, कापूस इ.) कृषी उत्पादनांच्या गोदामात धुरी देणे अथवा फवारणीसाठीच्या सेवा RBI, IRDA, SEBI, FSSAI, GSTN द्वारे सेवा. व्यावसायिक संस्थांना (नोंदणीकृत व्यक्ती) निवासी निवासस्थान भाड्याने देणे. कॉर्ड ब्लड बँकांद्वारे स्टेम पेशींच्या जतनाच्या मार्गाने पुरविल्या जाणार्‍या सेवा

या वस्तूसाठी मोजावे लागतील ज्यादा दाम

गेल्या महिन्यात जीएसटी परिषदेच्या बैठकीत ही जीएसटी लावण्याची शिफारस करण्यात आली होती. सरकारच्या मंजुरीनंतर टेट्रा पॅकमधील दही, लस्सी आणि ताकावर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीलबंद दही, लस्सी आणि ताक, तयार पीठ जीएसटी परीघात आणण्याची ही पहिलीच वेळ आहे. ब्लेड, कागद, कात्री, पेन्सिल, शार्पनर, चमचे, काटा चमचा, केक सर्व्हर्स. नकाशे आणि चार्ट, ऍटलेस यावरील जीएसटीत सरकारनं वाढ केली आहे. या निर्णयामुळे या वस्तूंवर 12 टक्क्यांऐवजी आता 18 टक्के जीएसटी अदा करावा लागणार आहे. एवढेच नाही तर या निर्णयामुळे एलईडी लाईट्स आणि लॅम्पचे दर ही वाढण्याची शक्यता आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.