AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30000 पगार, 40 लाखांचं लोन..; महाराष्ट्रात चेक बाऊन्सची सर्वाधिक प्रकरणं, आकडा वाचून उडेल झोप!

अभिनेता राजपाल यादवमुळे चेक बाऊन्स प्रकरण चर्चेत आलं आहे. देशातील तरुण पिढी कर्जाच्या जाळ्यात अडकत चालली आहे. चेक बाऊन्सची प्रकरणं वेगाने वाढत आहेत. यात महाराष्ट्र सर्वांत टॉपमध्ये आहे.

30000 पगार, 40 लाखांचं लोन..; महाराष्ट्रात चेक बाऊन्सची सर्वाधिक प्रकरणं, आकडा वाचून उडेल झोप!
Cheque BounceImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 23, 2026 | 3:21 PM
Share

अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं होतं. 9 कोटी रुपयांचं कर्ज फेडू न शकल्याने आणि चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी राजपालला शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर चेक बाऊन्स प्रकरणाविषयी देशभरात बरीच चर्चा झाली. देशात कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड करण्याचं विसरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर कर्ज घेणाऱ्यांमध्ये तरुण पिढीच सर्वांत पुढे आहे. अशी अनेक उदाहरणं समोर आली आहेत, ज्यामध्ये दरमहा पगाराच्या तुलनेत 100 पटीने जास्त रकमेचा लोन घेण्यात आला आहे. नंतर याच लोनचे हफ्ते फेडण्यात ते अपयशी ठरतात. याचमुळे देशभरात चेक बाऊन्सची प्रकरणं वाढत चालली आहे. ‘इकोनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, दर महिन्याला 25 ते 35 वयोगटातील शेकडो तरुण कर्जाच्या जाळ्यात अडकत आहेत.

1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या पिढीने आपल्या डोक्यावर कर्जाचं मोठं डोंगरच उभं केलं आहे. ही पिढी त्याच्या आधीच्या पिढ्यांपेक्षा खूप वेगळी आहे. मासिक पगार 30 ते 40 हजार रुपये असताना ही पिढी 30 ते 40 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेत आहे. या कर्जाच्या सापळ्यामागील मुख्य कारण म्हणजे कर्जाद्वारे उत्पन्न आणि खर्चातील तफावत भरून काढणं. परंतु हीच तफावत नंतर नियंत्रणाबाहेर जात आहे.

कर्ज घेण्याचा ट्रेंड का वाढतोय?

  • अनेकजण जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी, लाइफस्टाइलमध्ये बदल करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी, गॅझेट्ससाठी, प्रवासासाठी किंवा करिअरसाठी लोन घेतात.
  • हे लोन मोबाइल अॅप्लिकेशनवर सहज उपलब्ध असतात. त्यासाठी कोणतीही गॅरंटी लागत नाही. अशा प्रकारचे लोन सहजरित्या प्रोसेस होतात. यामुळेच अशा प्रकारच्या कर्जाचं मोठं डोंगरच उभं राहतंय.
  • जेव्हा उत्पन्न वाढत्या EMI ची भरपाई करण्यास अपयशी होतं, तेव्हा परिस्थिती आणखी बिकट होते. कारण आधीची कर्ज फेडण्यासाठी आणि हफ्ते भरण्यासाठी अधिक कर्ज घेतलं जातं.

चेक बाऊन्सच्या प्रकरणांमध्ये वाढ

देशात चेक बाऊन्सच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. आकडेवारीनुसार देशात 43 लाखांहून अधिक चेक बाऊन्सचे खटले प्रलंबित आहेत. चेक बाऊन्सच्या प्रकरणांमध्ये दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पाच राज्यांमध्ये 33 लाखांहून अधिक चेक बाऊन्स झाले आहेत. चेक बाऊन्सची सर्वाधिक प्रकरणं ही महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात 56 लाख चेक बाऊन्सची प्रकरणं प्रलंबित आहेत. तर 48 लाख चेक बाऊन्स प्रकरणांसह गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. फक्त पुण्यातच 30.15 कोटी रुपयांचे 780 चेक बाऊन्स झाले आहेत.

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?