CIL Recruitment 2021: कोल इंडियामध्ये 588 पदांवर संधी, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

कोल इंडिया लिमिटेडने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी) पदासाठी पदभरती जाहीर केली आहे.नोटिफिकेशनुसार एकूण 588 पदांची भरती केली जाईल. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोल इंडिया लिमिटेडची अधिकृत वेबसाईट coalindia.in ला भेट द्यावी लागेल.

CIL Recruitment 2021: कोल इंडियामध्ये 588 पदांवर संधी, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
jobs
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Aug 11, 2021 | 8:22 AM

CIL Recruitment 2021 नवी दिल्ली : कोल इंडिया लिमिटेडने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी) पदासाठी पदभरती जाहीर केली आहे. कोल इंडियाच्या नोटिफिकेशनुसार एकूण 588 पदांची भरती केली  जाणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोल इंडिया लिमिटेडची अधिकृत वेबसाईट coalindia.in ला भेट द्यावी लागेल. भारत सरकारच्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई, बी टेक आणि बीएससी अभियांत्रिकी सारखी अभियांत्रिकी पदवी घेतले उमेदवार अर्ज करु शकतात.

अर्ज करण्यास सुरुवात

कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार, मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी अर्ज प्रक्रिया 10 ऑगस्ट 2021 पासून सुरू होत आहे. पात्र उमेदवार 9 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करु शकतात. अर्जाचं शुल्क देखील 9 सप्टेंबरपर्यंत जमा करता येईल. कोल इंडियाकडून परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट coalindia.in वरील सूचना वाचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

रिक्त पदाचा तपशील

कोल इंडियानं जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण 588 पदांची भरती केली जाईल. मायनिंग इंजिनिअर 253 जागा, इलेक्ट्रिक इंजिनिअऱ 117, मेकॅनिकल इंजिनिअर 134, सिव्हिल इंजिनिअर 57, इंडस्ट्री इंजिनिअर 15 आणि जिओलॉजी 15 जागांसाठी भरती होणार आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्यावी.

पात्रता

भारत सरकारच्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई, बी टेक आणि बीएससी अभियांत्रिकी सारखी अभियांत्रिकी पदवी घेतले उमेदवार अर्ज करु शकतात. पदवीमध्ये 60% गुण मिळवलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र असतील. भूविज्ञान विभागात अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संबंधित विषयासह एम.एस.सी. किंवा एम. टेक. करणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा

कोल इंडियाच्या जाहिरातीनुसार या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 30 वर्षे असावे. जे उमेदवार आरक्षणाच्या कक्षेत येतात त्यांना नियमांनुसार वयोमर्यादेमध्ये विशेष सवलत दिली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय.

इतर बातम्या:

BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती, प्रोजेक्ट इंजिनिअर, ट्रेनीच्या 511 पदांवर संधी, 25 ते 35 हजारांपर्यंत पगार

PDCC Recruitment 2021: पुणे जिल्हा बँकेत क्लार्क पदांवर भरती, पदवीधरांसाठी चांगली संधी

CIL Recruitment 2021 Vacancy for Management Trainee 588 post in Coal India Limited Know how to Apply check details here

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें