PDCC Recruitment 2021: पुणे जिल्हा बँकेत क्लार्क पदांवर भरती, पदवीधरांसाठी चांगली संधी

पुणे जिल्ह्यातील अग्रणी बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मर्यादित पुणे यांच्याकडून बँकेसाठी लेखनिक पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेतर्फे एकूण 356 जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे.

PDCC Recruitment 2021: पुणे जिल्हा बँकेत क्लार्क पदांवर भरती, पदवीधरांसाठी चांगली संधी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Aug 22, 2021 | 3:57 PM

पुणे: पुणे जिल्ह्यातील अग्रणी बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांच्याकडून बँकेसाठी लेखनिक पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेतर्फे एकूण 356 जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना 16 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करतायेणार आहेत. सरळसेवा पद्धतीनं ही भरती प्रक्रिया होणार आहे.

पात्रता

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे मधील लेखनिक पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारानं कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर उमेदवारानं एमएससीआयटी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेने किमान 90 दिवसांचा संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेलं असणं आवश्यक आहे.

किती पदांसाठी भरती

पुणे जिल्हा बँकेने एकूण 356 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पदांची संख्या कमी किंवा जास्त ठेवण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा 16 ऑगस्ट हा अखेरचा दिवस आहे. तर, अर्जा शुल्क जमा करण्याची मुदत 17 ऑगस्टपर्यंत आहे. ऑनलाईन परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल, असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम

लेखनिक पदासाठी 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. बँकिंग व सहकार, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी भाषा ज्ञान, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी यावर प्रश्न विचारले जातील.

मुलाखत

ऑनलाईन परीक्षेत ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. मुलाखतीसाठी 10 गुण निश्चित करण्यात आले आहेत.

ऑनलाईन परीक्षा शुल्क

पुणे जिल्हा बँकेच्या ऑनलाईन परीक्षेसाठी 885 रुपयांचं शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागणार आहे. हे शुल्क 17 ऑगस्टपर्यंत भरता येईल. निवड झालेल्या उमेदवारांना 13500 इतका पगार प्रोबेशन कालावधीमध्ये दिला जाणार आहे.

अर्ज कुठे सादर करायचा?

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://www.pdccbank.co.in/ आणि https://www.pdccbank.co.in/career या वेबसाईटला भेट द्यावी.

इतर बातम्या

BSF Recruitment 2021: बीएसएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी , जीडी कॉन्स्टेबलच्या 269 पदांवर भरती

आरोग्य विभागात 3 हजार 466 जागांवर बंपर भरती, अर्ज करा अन् मिळवा नोकरी

PDCC Clerk Recruitment 2021 for 356 post check details here

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें