AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CISF Tradesman Constable Admit Card 2021: सीआईएसएफ ट्रेड्समन कॉन्स्टेबल परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड जारी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडून ट्रेडसमन परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड जाहीर करण्यात आलं आहे. (CISF tradesman constable admit card)

CISF Tradesman Constable Admit Card 2021: सीआईएसएफ ट्रेड्समन कॉन्स्टेबल परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड जारी
प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Mar 02, 2021 | 3:59 PM
Share

नवी दिल्ली: सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) ट्रेडसमन कॉन्स्टेबल परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड जारी करण्यात आलं आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची ट्रेडसमन (CISF Tradesman Constable Admit Card) परीक्षा 21 मार्चला होणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडून ट्रेडसमन परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड जाहीर करण्यात आलं आहे. ट्रेडसमन परीक्षेसाठी ज्यांनी अर्ज केले असतील त्यांनी सीआयएसएफच्या वेबसाईटला भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या cisfrectt.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल. (CISF tradesman constable admit card 2021 released download here)

लेखी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांची निवड

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडून लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. CISF ट्रेडसमन कॉन्स्टेबल परीक्षेसाठाी देशभरात परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. 21 मार्च रोजी देशातील 37 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली जाईल. लेखी परीक्षेला सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. परीक्षेदरम्यान कोरोनाविषयक नियमांचं पालन करण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.

CISF Tradesman Constable Admit Card 2021 डाऊनलोड कसे कराल?

  1. अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सीआयएसएफच्या ऑफिशियल वेबसाईट cisfrectt.in वर भेट द्या
  2. होम पेज वरील ‘Login’ लिंक वर क्लिक करा, त्यानंतर नवीन पेज ओपन होईल
  3. नव्या पेजवर तुम्ही लॉगीन डिटेल्स भरा, त्यानंतर तुम्ही अॅडमिट कार्ड डाऊनलोड करुन ठेवा.

19196 उमेदवारांची परीक्षेसाठी निवड

CISF ट्रेडसमन कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी 19196 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. उत्तर विभागात 4427, एनसीआर विभागात 2940, पश्चिम विभागात 1486, मध्य विभाग 1051, पूर्व विभागात 2792, दक्षिण विभागात 419 आणि दक्षिण पूर्व 1871 तर उत्तर पूर्व विभागातील 420 उमेदवार परीक्षा देणार आहेत.

परीक्षेचे स्वरुप

CISF ट्रेडसमन कॉन्स्टेबल भरती परीक्षा लेखी पद्धतीनं होणार आहे. ही परीक्षा 100 गुणांची असेल. हे प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाची असेल. परीक्षेमध्ये सामान्यज्ञान, सामान्य गणित, तार्किक क्षमता याविषयांवरील प्रश्न विचारले जातील. उमेदवारांना ही परीक्षा देताना इंग्रजी आणि हिंदीविषयी सामान्यज्ञान असणं आवश्यक आहे. सदर परीक्षेची वेळ 2 तासांची असेल.

संबंधित बातम्या :

भविष्यात भारतात डिजिटल कर्मचार्‍यांना सर्वाधिक मागणी, अमेझॉनच्या अहवालात खुलासा

RBI Grade B Phase 1 Admit Card 2021: प्रिलिम परीक्षेचे हॉल तिकिट जारी, असे करा डाऊनलोड

(CISF tradesman constable admit card 2021 released download here)

बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं....
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.