भविष्यात भारतात डिजिटल कर्मचार्‍यांना सर्वाधिक मागणी, अमेझॉनच्या अहवालात खुलासा

भविष्यात भारतात डिजिटल कर्मचार्‍यांना सर्वाधिक मागणी, अमेझॉनच्या अहवालात खुलासा (Demand for digital staff in India will increase in the future)

भविष्यात भारतात डिजिटल कर्मचार्‍यांना सर्वाधिक मागणी, अमेझॉनच्या अहवालात खुलासा
अमेझॉन इंडिया आणि महिंद्रा इलेक्ट्रिकमध्ये करार
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 7:39 PM

मुंबई : अमेझॉनची अमेझॉन वेब सर्व्हिसेस इंक (एडब्ल्यूएस) ने आज आपला नवीन संशोधन अहवाल जाहीर केला. या अहवालाला ‘अनलॉकिंग एपीएसीची डिजिटल पोटेंशियल : चेंजिंग डिजिटल स्किल नीड्स एंड पॉलिसी अप्रोचेस’ बदलणे असे शीर्षक देण्यात आले आहे. हा अहवाल धोरण आणि आर्थिक सल्लागार संस्था अल्फाबीटा यांनी तयार केला असून एडब्ल्यूएसने जाहीर केला आहे. या अहवालात नोकऱ्यांमध्ये वापरत असलेल्या डिजिटल कौशल्यांचे विश्लेषण केले गेले आहे. या व्यतिरिक्त, 6 देशांमध्ये पुढील पाच वर्षांत कोणते डिजिटल कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल याचे विश्लेषणही अहवालात करण्यात आले आहे. या देशांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाचा समावेश आहे. (Demand for digital staff in India will increase in the future)

2025 पर्यंत डिजिटल स्किलला सर्वाधिक मागणी

संशोधनात भारतात 500 हून अधिक डिजिटल कामगारांचे सर्वेक्षण केले गेले. यामध्ये तंत्रज्ञान तज्ञ, उद्योजक आणि धोरणकर्ते यांची मुलाखत घेण्यात आली. या संशोधनात मॅन्युफॅक्चरिंग आणि एज्युकेशनसारख्या गैर-तंत्रज्ञानासाठी डिजिटल कौशल्ये आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. बांधकाम क्षेत्रात, क्लाउड आर्किटेक्ट डिझाइन आणि ओरिजनल डिजिटल कंटेंटसारखे सॉफ्टवेअर आणि वेब अॅप्लिकेशन तयार करण्याची क्षमता यासारख्या डिजिटल कौशल्यांना 2025 पर्यंत मोठी मागणी असेल. बांधकाम क्षेत्रातील 50 टक्क्यांहून अधिक डिजिटल कामगारांचा असा विश्वास आहे की त्यांना पूर्ण कार्यक्षमतेने नोकरी करण्यासाठी या कौशल्यांची आवश्यकता असेल. शिक्षणाच्या क्षेत्रात डिजिटल सुरक्षा विकसित करण्याची क्षमता, सायबर फॉरेन्सिक टूल्स आणि तंत्रज्ञानात महत्वाची कौशल्य असतील. दुर्गम भागात शिक्षणासाठी आणि शिकण्यासाठी इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता शिक्षणासोबत शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी सक्षम असणेही फार महत्वाचे आहे.

सध्या 13 टक्के संख्या

संशोधनात असे दिसून आले आहे की, सध्या भारतात डिजिटल कौशल्य अवगत असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या एकूण कामगारांपैकी 13 टक्के आहे. संशोधनात असा अंदाज असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, 2025 पर्यंत डिजिटल कौशल्य अवगत असलेल्या कर्मचार्‍यांची गरज आजच्या संख्येच्या नऊ पट असेल. भारतातील सरासरी कर्मचाऱ्यांना 2025 पर्यंत नवीन तंत्रज्ञानाची प्रगती आणि उद्योगांच्या मागणीनुसार सात नवीन डिजिटल कौशल्ये शिकण्याची आवश्यकता आहे. एकंदरीत, 2020 ते 2025 पर्यंत भारतात 3.9 अब्ज लोकांना डिजिटल कौशल्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असेल.

क्लाउड कंप्यूटिंगमध्येही पुढे

अहवालात असेही समोर आले आहे की, अद्याप 76 टक्के डिजिटल कर्मचार्‍यांना क्लाउड कंप्यूटिंगचे प्रशिक्षण दिले जाण्याची अपेक्षा आहे. डिजिटल कर्मचार्‍यांना कार्यक्षमतेत परिपूर्ण असण्यासाठी या तंत्रज्ञानात परफेक्ट असणे आवश्यक असेल. क्लाउड आर्किटेक्चर डिझाईन, सॉफ्टवेअर ऑपरेशन्स सपोर्ट, वेबसाईट / गेम / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट / मोठ्या प्रमाणात डेटा मॉडेलिंग आणि सायबर सिक्युरिटी कौशल्ये ही भारतातील सर्वाधिक मागणी असणारी पाच डिजिटल कौशल्ये आहेत. भावी पिढीतील क्लाउड प्रोफेशनल्ससाठी भारतातील उच्च शिक्षण संस्थांनी अलीकडेच एडब्ल्यूएसने डिझाइन केलेले आणि एकत्रित केलेले क्लायड कॉम्प्यूटिंगचा महाविद्यालयाच्या मुख्य अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. हा प्रोग्राम क्लाऊड आर्किटेक्चर, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्लाऊड स्किल्सच्या वाढत्या मागणीनुसार तयार करण्यात आला आहे.

डिजिटल कर्माचाऱ्यांची मागणी अधिक

एआईएसपीएल, एडब्ल्यूएस इंडिया आणि साऊथ आशियामध्ये पब्लिक सेक्टरचे प्रेसिडेंट राहुल शर्मा यांनी सांगितले की, या संशोधनात बांधकाम आणि शिक्षण यासारख्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात डिजिटल कामगारांच्या मागणीबाबत सांगण्यात आले आहे. एडब्ल्यूएस अधिकाधिक विद्यार्थी आणि कर्मचार्‍यांना क्लाऊड कौशल्यासह सुसज्ज करण्यास प्रयत्नशील आहे, ज्यामुळे सर्व क्षेत्रांत डिजिटल बदलास मदत होईल. आम्ही इतर बर्‍याच शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक संस्थांसह करार करीत क्लाऊड स्किल्सची व्याप्ती वाढवित आहोत. क्लाऊड स्किल्स अवगत असलेल्या कर्मचार्‍यांद्वारे नाविन्यास गती येईल आणि भारतातील उत्पादनं जगातील इतर देशांच्या स्पर्धेत सज्ज असतील.

ऑनलाईन कंटेंटला वाढती मागणी

एडब्ल्यूएस अनेक शाखांमध्ये विनामूल्य प्रशिक्षण संधी देते, ज्यामध्ये 500 हून अधिक विनामूल्य अभ्यासक्रम आहेत. त्यात इंटरअॅक्टिव्ह लॅब आणि दिवसभर व्हर्च्युअल प्रशिक्षण सत्रांचा समावेश आहे, ज्यामध्ये एडब्ल्यूएस प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो. एडब्ल्यूएस सर्वाधिक मागणी असलेल्या नोकर्‍या आणि करियर मार्गांसाठी विद्यार्थ्यांना विनामूल्य ऑनलाईन लर्निंग कंटेंट पुरवते. या मागणीनुसार कर्मचाऱ्यांना क्लाउड इंजिनियर, सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्ट, मशीन लर्निंग साइंटिस्ट आणि डेटा वैज्ञानिक म्हणून नोकरीसाठी आवश्यक कौशल्य शिकवली जातात. (Demand for digital staff in India will increase in the future)

इतर बातम्या

खासगी कंपनीत काम करताय, मग ही कागदपत्रे त्वरित जमा करा; अन्यथा पगार लटकणार

‘अनेक महिलांवर बलात्कार, शेकडोंची हत्या’, ‘या’ देशातील अत्याचाराच्या घटनेने जग हादरलं

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.