‘अनेक महिलांवर बलात्कार, शेकडोंची हत्या’, ‘या’ देशातील अत्याचाराच्या घटनेने जग हादरलं

'अनेक महिलांवर बलात्कार, शेकडोंची हत्या', 'या' देशातील अत्याचाराच्या घटनेने जग हादरलं

आफ्रिकन देश इरीट्रियाच्या सैनिकांनी (Eritrean Soldiers) शेजारी राष्ट्र असलेल्या इथियोपियामध्ये (Ethiopia) शेकडो नागरिकांची सामूहिक हत्या केल्याचं समोर आलंय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 26, 2021 | 6:42 PM

Eritrean Soldiers Killed Ethiopia Civilians आद्दीस आबाबा : आफ्रिकन देश इरीट्रियाच्या सैनिकांनी (Eritrean Soldiers) शेजारी राष्ट्र असलेल्या इथियोपियामध्ये (Ethiopia) शेकडो नागरिकांची सामूहिक हत्या केल्याचं समोर आलंय. इथियोपियाच्या टिग्रे राज्यातील प्राचीन शहर असलेल्या एग्जममध्ये (Axum) ही घटना घडलीय. 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर दरम्यान हे हत्याकांड झाल्याची माहिती आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था एम्नेस्टी इंटरनेशनलने (Amnesty International) दिलीय. मागील अनेक महिन्यांपासून इथियोपियाच्या उत्तर भागातील टिग्रे राज्यात (Tigray) इथियोपियाचं केंद्र सरकार आणि स्थानिक पक्ष टीपीएलएफमध्ये संघर्ष सुरु आहे. त्यातूनच ही घटना झालीय (Allegations of Ritrean soldiers killed ethiopia civilians in axum report by Amnesty international).

एम्नेस्टीने म्हटलं आहे, “28-29 नोव्हेंबर 2020 रोजी 24 तासांच्या आत एग्जम शहरात इरीट्रियाच्या सैन्याने शेकडो नागरिकांची हत्या केली. या घटनेबाबत 41 साक्षीदारांनी माहिती दिलीय.” एम्नेस्टीने गौप्यस्फोट केल्यानंतर टिग्रेतील इथियोपिया सरकारच्या (Ethiopian Government) टास्क फोर्सने एग्जममधील हिंसाचाराचा तपास सुरु असल्याचं म्हटलंय.

इरीट्रियाकडून जुना बदला म्हणून हत्याकांड

इथियोपीयाच्या मानवाधिकार आयोगाने म्हटलं, “इरीट्रियाई सैनिकांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांची हत्या केलीय. कारण टिग्रेमधील स्थानिक पक्ष टिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंटच्या (टीपीएलएफ) कार्यकर्त्यांनी याआधी अशाचप्रकारे हल्ला केला होता. त्याचाच बदला म्हणून इरीट्रियाने हे हत्याकांड केलंय.”

इरीट्रियाचे परराष्ट्र मंत्री ओस्मान सालेह मोहम्मन (Osman Saleh Mohammed) यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय. टिग्रेवरी TPLF च्या नियंत्रणामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत मदत पोहचवणं अवघड झाल्याचं आणि TPLF च्या लोकांकडून टिग्रेतील महिलांवर बलात्कार होत असल्याचेही आरोप होत आहेत. विशेष म्हणजे या भागात माध्यमांनाही जाणं कठिण आहे. त्यामुळे तेथील घटनांची माहिती जगासमोर येणंही कठिण झालंय.

या संघर्षाचं कारण काय?

इथियोपियामधील स्थानिक पक्ष टीपीएलएफ आणि केंद्र सरकारमध्ये मागील अनेक महिन्यांपासून तणाव (Ethiopia Tigray Conflict Explained) सुरु आहे. सध्याच्या संघर्षामागील प्रमुख कारण हाच तणाव आहे. इथियोपियाच्या पंतप्रधानांनी जून महिन्यात होऊ घातलेल्या देशाच्या निवडणुका कोरोनाचं कारण देत (Coronavirus Pandemic) पुढे ढकलल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाला टीपीएलएफने बेकायदेशी ठरवलंय. पंतप्रधान अबी अहमद यांच्याकडे बहुमत नसल्याचाही आरोप टीपीएलएफने केलाय.

यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच इथियोपियाच्या पंतप्रधानांनी टीपीएलएफ विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला. टीपीएलएफने मॅकेले येथील सैन्याच्या छावणीवर हल्ला चढवल्याचा आरोप करत सरकारने कारवाईचा निर्णय घेतला. टीपीएलएफच्या लढाऊ कार्यकर्त्यांची संख्या जवळपास अडीच लाख इतकी सांगितली जाते.

हेही वाचा :

जेलमध्येच दंगल उसळली तर? इक्वेडोरमध्ये कैद्यांचा चाकू, रॉडनं जीवघेणा हल्ला, मृत्यूचं तांडव

Mexico Plane Crash: एअर फोर्सचं विमान दुर्घटनाग्रस्त, 6 जणांचा मृ्त्यू, कारण अस्पष्ट

व्हिडीओ पाहा :

Allegations of Ritrean soldiers killed ethiopia civilians in axum report by Amnesty international

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें