जेलमध्येच दंगल उसळली तर? इक्वेडोरमध्ये कैद्यांचा चाकू, रॉडनं जीवघेणा हल्ला, मृत्यूचं तांडव

इक्वाडोरमधील 800 पोलीस कर्मचारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितलं. (Ecuador Prisons Gangs Battle)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:28 AM, 24 Feb 2021
जेलमध्येच दंगल उसळली तर? इक्वेडोरमध्ये कैद्यांचा चाकू, रॉडनं जीवघेणा हल्ला, मृत्यूचं तांडव
इक्वेडोरमधील तुरुंगात कैद्यांचा हिंसाचार

क्विटो : इक्वाडोर (Ecuador) देशातील तीन शहरांमधील तुरुंगातून पळ काढण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळ्यांमध्ये दंगल उसळली. या टोळीयुद्धात तब्बल 62 कैद्यांचा मृत्यू झाला. तुरुंग अधिकारी एडमंडो मोनकॅयो (Edmundo Moncayo) यांनी यासंबंधी माहिती दिली. (Ecuador Prisons  Drug Gangs Battle for Control)

इक्वाडोरमधील 800 पोलीस कर्मचारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितलं. स्थानिक वेळेनुसार सोमवारी रात्री उशिरा ही झटापट झाल्यानंतर शेकडो अधिकाऱ्यांना तुरुंगात तैनात करण्यात आलं.

वर्चस्ववादातून टोळीयुद्ध

दोन्ही टोळ्या तुरुंगात गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात होत्या. पोलिसांना याविषयी माहिती मिळाल्यानंतर हत्यारांचा शोध सुरु करण्यात आला. त्याच वेळी तुरुंगात हिंसाचार भडकला. कैद्यांनी परस्पर गँग्जच्या सदस्यांवर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला.

कुठल्या तुरुंगात किती बळी?

दक्षिण इक्वाडोरच्या क्युकेनमध्ये (Cuenca) 33 जणांचा मृत्यू झाला. तर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील गुआयाकिल (Guayaquil) शहरात 21 कैदी ठार झाले. केंद्रीय शहर लाटाकुंगा (Latacunga) मध्ये आठ जणांचा हिंसाचाारात मृत्यू झाला.

तुरुंग अधिकारी मोनकॅयो यांच्या माहितीनुसार देशातील तुरुंगातील 70 टक्के कैदी या केंद्रांमध्ये आहेत. त्यामुळे याच्या नेतृत्वावरुन प्रतिस्पर्धी टोळ्यांमध्ये नेहमीच वर्चस्वावरुन हिंसा उफाळते.

संबंधित बातम्या :

15 दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर, पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळला पुन्हा अटक

भारताच्या गुप्तहेराला जर्मनीच्या न्यायालयाची तुरुंगवासाची शिक्षा, कोण आहे हा गुप्तहेर?

(Ecuador Prisons  Drug Gangs Battle for Control)