मोठी बातमी! महाविकास आघाडी फुटली? ठाकरे बंधूंची युती होताच शरद पवारांचा मोठा निर्णय, महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट
आज अखेर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आहे, मात्र या युतीची घोषणा होताच अता राष्ट्रवादी शरद पवार गटानं मोठा निर्णय घेतला असून, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होणार असल्याची चर्चा होती, या पार्श्वभूमीवर अनेकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीगाठी आणि बैठका देखील झाल्या होत्या, सर्व आधीच ठरलं होतं, फक्त युतीची औपचारिक घोषणा बाकी होती, ती देखील आज झाली आहे. ठाकरे बंधूंकडून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आहे, दरम्यान जरी युतीची घोषणा झाली असली तरी मात्र मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाचं सूत्र काय असणार? मनसेला किती जागा मिळणार? शिवसेना ठाकरे गटाला किती जागा मिळणार? हे अजूनही गुलदस्त्यात आहेत. जागा वाटप जाहीर करण्यात आलेलं नाहीये.
दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेससोबत युती करण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युतीची बोलणी थांबवली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार गट मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस सोबत युती करण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेसाठी मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट युती करणार असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. शिवसेना ठाकरे गटानं आपल्या कोट्यातून शरद पवार गटाला जागा देण्याची तयारी दर्शवली आहे, अशी देखील माहिती समोर येत होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेससोबत युती करणार असल्याची चर्चा आहे.
मनसेसोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये युती होणार नाही असं काँग्रेसकडून सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आलं होतं, तर मनसेसोबतच्या युतीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाम होते, त्यामुळे आता मुंबईत ठाकरे गट आणि मनसेची युती झाली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
