Maharashtra HSC 12th Result 2022 Pass Percentage : बारावीचा निकाल लागला, कोकण अव्वल; मुलींची बाजी, मुंबई शेवटी, तुमचा निकाल tv9marathi.comवर

फेब्रुवारी-मार्च 2020-21च्या तुलनेत या वर्षीच्या निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2021मध्ये बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला होता. यंदा निकालात कोकण आणि मुंबई सर्वात जास्त आणि सर्वात कमी अनुक्रमे पाहता येईल.

Maharashtra HSC 12th Result 2022 Pass Percentage : बारावीचा निकाल लागला, कोकण अव्वल; मुलींची बाजी, मुंबई शेवटी, तुमचा निकाल tv9marathi.comवर
बारावीचा निकाल
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

| Edited By: रचना भोंडवे

Jun 08, 2022 | 1:34 PM

12 वी चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पुणे : बारावी अर्थात एसएससीच्या निकालाची (HSC Results 2022) सगळ्यात मोठी बातमी आहे. यावर्षी बारावीचा निकाल 94. 22 टक्के लागला आहे. सर्वात जास्त निकाल कोकण (Kokan) विभागाचा 97.21 टक्के, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.91 टक्के लागला आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे. बोर्डाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी परीक्षा आणि निकाल यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, यावर्षीही निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. तर मुलांच्या तुलनेत 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. फेब्रुवारी-मार्च 2020-21च्या तुलनेत या वर्षीच्या निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2021मध्ये बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला होता. यंदा निकालात कोकण आणि मुंबई सर्वात जास्त आणि सर्वात कमी अनुक्रमे पाहता येईल.

कोविडच्या पार्श्वभूमीवर जादा वेळ

75 टक्के अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा तर प्रात्यक्षित परीक्षा तर 40 टक्के अभ्यासक्रमावर घेण्यात आली होती. तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा तसेच प्रकल्प यासाठी दोन कालावधी देण्यात आले होते. यात लेखी परीक्षेचा आधीचा कालावधी आणि परीक्षेच्या नंतरचाही कालावधी गेला होता. 60 ते 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी तीस मिनिटे सरसकट जादा वेळ देण्यात आला. 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे जादा वेळ कोविडच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला, असे गोसावी यांनी सांगितले.

बारावीच्या निकाल घोषित करताना शरद गोसावी

शाळा तिथे परीक्षा केंद्र

परीक्षेसाठी सर्व घटकांना व्यवस्थित सूचना देण्यात आल्या होत्या. आरोग्य विभाग, शासन यांच्या सूचना सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आल्या होत्या. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे शाळा तिथे परीक्षा केंद्र यंदा देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता परीक्षेसाठी सकारात्मक झाली. बारावीसाठी एकूण 153 विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यात विज्ञान या शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या चार माध्यमातून प्रश्नपत्रिका होत्या. तर अन्य शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती आणि कन्नड या सहा माध्यमामधून प्रश्नपत्रिका देण्यात आली होती.

विभागावर निकाल

– पुणे 93.61

– नागपूर 96.52

– औरंगाबाद 94.97

– मुंबई 90.11

– कोल्हापूर 95.07 –

अमरावती 96.34

– नाशिक 95.34

– लातूर 95.25

– कोकण 97.21

शाखांनुसार निकाल

– विज्ञान 98.30

– कला 90.52

– वाणिज्य 91.71

– व्यवसाय अभ्यासक्रम 92.40

हे सुद्धा वाचा

– आय.टी. आय 66.41

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें