बारावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची संधी, 304 पदांसाठी..

IAF Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी झटपट या भरतीसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

बारावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची संधी, 304 पदांसाठी..
Indian Air Force
| Updated on: Jun 03, 2024 | 12:00 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

विशेष म्हणजे थेट भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तब्बल 304 पदांसाठी ही भरती सुरू आहे. ही एकप्रकारची बंपर किंवा मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 मे पासून सुरू झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत.

indianairforce.nic.in. या साईटवर जाऊन आपण भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील मिळेल. भारतीय हवाई दलात फ्लाइंग ब्रँच, ग्राउंड ड्युटी, ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

गणित आणि भौतिकशास्त्र विषयात उमेदवाराला बारावीमध्ये किमान 50 टक्के मार्क असणे आवश्यक आहे. हेच नाही तर पदवीधर उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. मात्र, पदवीच्या अभ्यासात 60 टक्के मार्क असणे आवश्यक आहे. बीई आणि बीटेक पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे उमेदवारांनी व्यवस्थित तपासून घ्यावे.