AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, थेट 300 पेक्षा अधिक पदांसाठी भरती आणि…

India Post Pament Bank Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रकियेसाठी फटाफट अर्ज करावीत. केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही संधी आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, थेट 300 पेक्षा अधिक पदांसाठी भरती आणि...
India Post Pament Bank
| Updated on: Oct 16, 2024 | 4:43 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून इच्छुकांनी फटाफट अर्ज करावीत. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) कडून राबवली जातंय. थेट  इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेतून 344 पदे ही भरली जातील. देशभरात ग्रामीण डाक सेवक (GDS) कार्यकारी पदाच्या 344 पदे भरण्यासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. प्रत्येक राज्य विहित पदे भरली जातील.

भारतीय टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक या पदावर काम करणारे उमेदवार एक्झिक्युटिव्ह होण्यासाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. 20 ते 35 वयोगटाचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. पदव्युत्तर पदवीसह ग्रामीण डाक सेवक म्हणून 2 वर्षांचा अनुभव आवश्यक असेल. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. उमेदवारांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत. 31 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

www.ippbonline.com या साईटवर जाऊन उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करता येतील. येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.