Indian Army SSC Recruitment 2021: इंडियन आर्मीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये भरती, टेक्निकल केडरमध्ये 189 पदांसाठी संधी

भारतीय सेना दलामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 189 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. Indian Army SSC Recruitment 2021

Indian Army SSC Recruitment 2021: इंडियन आर्मीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये भरती, टेक्निकल केडरमध्ये 189 पदांसाठी संधी
Indian army

नवी दिल्ली: भारतीय सेना दला मधील शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इंडियन आर्मीने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू होणाऱ्या 57 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन साठी आणि 58 व्या सर्विस कमिशनमधील विविध कोर्सेस ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एकूण 189 पदांवर भरती प्रक्रिया केली जाणार आहे. (Indian Army SSC Recruitment 2021 for Engineers technical 189 posts)

इंडियन आर्मीच्या नोटिफिकेशन नुसार 189 पदांवर विविध विभागाची भरती होईल. इंडियन आर्मी मध्ये नोकरी करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन मध्ये ज्यांना अर्ज करायचा आहे ते इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 ही आहे.

पात्रता

इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल मध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराने भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंगची डिग्री उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. याशिवाय, इंजिनिअरिंगच्या अंतिम सत्राची परीक्षा देणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. मात्र, त्यांनी ऑक्टोबर 2021 पूर्वी डिग्री मिळवणे आवश्यक आहे. याशिवाय त्या उमेदवारांचे वय 20 वर्ष ते 27 वर्ष यादरम्यान असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

स्टेप 1: इंडियन आर्मी च्या वेबसाईट भेट द्या
स्टेप 2 : वेबसाईटवरील होम पेज वरील ऑफिसर्स एन्ट्री ॲप्लिकेशन वर क्लिक करा.
स्टेप 3: यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यावर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 4: कर्जत सांगितलेल्या सर्व डिटेल्स सादर करा.
स्टेप 5: मिळालेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड याद्वारे पुढील प्रक्रिया पूर्ण करुन अर्ज भरा
स्टेप्स 6: हा एप्लीकेशन फॉर्म ची प्रिंटआऊट काढून तुमच्यासोबत ठेवा.

ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी येथे क्लिक करा


संबंधित बातम्या

आर्मी कँटीनमध्ये परदेशी उत्पादनांवर बंदी; 422 पैकी 230 उत्पादने चिनी

भारतीय जवानांच्या कामाला सलाम, हिमवृष्टीतही गर्भवती महिलेला खांद्यावर नेलं रुग्णालयात

Indian Army SSC Recruitment 2021 for Engineers technical 189 posts

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI