AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

SBI ने समवर्ती लेख परीक्षक पदांसाठी अर्ज सुरू केले आहेत. यासाठी उमेदवार १५ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाणार आहे.

एसबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज
sbi vacancy
| Edited By: | Updated on: Mar 16, 2025 | 9:49 PM
Share

SBI ने समवर्ती लेख परीक्षक पदांसाठी अर्ज सुरू केले आहेत. यासाठी उमेदवार १५ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहेत. मुलाखतीच्या आधारे तयार केलेल्या मेरिट लिस्ट मधून निवड केली जाईल. हे अर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाने समवर्ती लेख परीक्षक पदांसाठी काढले आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यासाठी शेवटची तारीख १५ मार्च आहे. अशा परिस्थितीत ज्या इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचं असेल ते १५ मार्च पर्यंत अर्ज करू शकतात. ते SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

एकूण ११९४ पदांसाठी भरतीसाठी अर्ज जागा मागविण्यात आले आहेत. बँकेच्या notificationchya आधारे, अर्ज करणारा उमेदवार बँकेच्या सेवेतून निवृत्त झाला पाहिजे. उमेदवाराला स्वेच्छेने सेवानिवृत्त/राजीनामा/निलंबित किंवा अन्यथा सेवानिवृत्त होण्यापूर्वी बँक सोडता येणार नाही.  SBI आणि त्याच्या ई-सहयोगी बँकांचे अधिकारी जे MMGS-III, SMGS-IV/V आणि TEGS-VI म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत ते नियुक्तीसाठी पात्र मानले जातील.

असा करा अर्ज  

१)SBI च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जा. २)होम पेजवर दिलेल्या करिअर लिंकवर क्लिक करा. ३)एक नवीन पेज उघडेल, जिथे SBI RBO रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा. ४)आता अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

कशी होणार निवड? 

१) जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, नियुक्ती किमान १ वर्ष आणि कमाल ३ वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षापर्यंत असेल. २) मुलाखतीच्या आधारे निवड होईल. ३) बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंगचे नियम ठरवेल आणि त्यानंतर बँकेने ठरविल्यानुसार काही उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत एकूण १०० गुणांची असेल. ४) मुलाखतीतील पात्रता गुण बँकेद्वारे ठरवले जातील. अंतिम निवडीसाठी मेरिट लिस्ट केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने तयार केली जाईल. एकापेक्षा जास्त उमेदवारांनी समान कट-ऑफ गुण प्राप्त केल्यास, अशा उमेदवारांना त्यांच्या वयाच्या उतरत्या क्रमाने गुणवत्तेत स्थान दिले जाईल.

ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.