Sarkari Naukri : परीक्षा न देता मिळवा नोकरी, UPSC मध्ये अनेक जागांवर भरती

यूपीएससीने अनेक पदांवर भरती (UPSC recruitment 2021) सुरू केली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:59 PM, 3 Feb 2021
Sarkari Naukri : परीक्षा न देता मिळवा नोकरी, UPSC मध्ये अनेक जागांवर भरती
केंद्रीय लोकसेवा आयोग

नवी दिल्ली : यूनियन पब्लिक सर्व्हिस कमीशन (UPSC) तुम्हाला कुठलीही परीक्षा न देता केंद्र सरकारसोबत नोकरी करण्याची संधी देत आहे. यूपीएससीने अनेक पदांवर भरती (UPSC recruitment 2021) सुरू केली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. या नोकरभरतीसंदर्भात UPSC च्या अधिकृत वेबसाईटवरून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. या जागांवर अर्ज करण्यासाठी 11 फेब्रुवारी ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. (jobs alert sarkari naukri upsc recruitment 2021 for processing assistant and various post)

UPSC कडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण 296 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये डेटा डेटा प्रोसेसिंग असिस्टेंट, असिस्टेंट पब्लिक प्रॉसिक्युटर, जूनिअर टेक्निकल ऑफिसर, स्पेशलिस्ट ग्रेड 3 असिस्टेंट प्रोफेसर, लेक्चरर (मेडिकल सोशल वर्क) आणि असिस्टेंट डायरेक्टर (फिशिंग हार्बर) या पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

असा करा अर्ज

या जागांवर अर्ज करण्यासाठी तुम्हाला यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईवर upsconline.nic.in लॉगइन करावं लागेल. इथे अर्जाच्या लिंकवर क्लिक केल्यानंचर रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक निवेदन अर्ज भरा. यामध्ये जनरल, ओबीसी, आर्थिक परिस्थितीने कमकुवत अशा श्रेणींमध्ये उम्मीदवारांनी अर्ज भरा. यासाठी 25 रुपये फी आकारली जाईल. तर इतर श्रेण्यांसाठी फी घेतली जाणार नाही.

शैक्षणिक योग्यता आणि वयाची मर्यादा

या जागांवर अर्ज करण्यासाठी उमेदवार कम्प्यूटर सायन्स, कम्प्यूटर अॅप्लिकेशन्स (एमसीए), आयटी इंजिनिअरिंग, बीई (बीटी/बीटेक), मेडिकल (एमबीबीएस), लॉ (एलएलबी / एलएलएम) ची पदवी असणं महत्त्वाचं आहे.

डाटा प्रोसेसिंग असिस्टेंट, असिस्टेंट पब्लिक प्रॉसिक्यूटर, जूनियर टेक्निकल ऑफिसर या पदांसाठी 30 ही वोयमर्यादा ठरवण्यात आली आहे. तर असिस्टेंट डायरेक्टर्सच्या पदासाठी 35 वर्ष ही वयोमर्यादा असणार आहे. अधिक माहितीनुसार, 40 वर्ष स्पेशलिस्ट असिस्टेंट प्रोफेसरसाठी वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. ओबीसी श्रेणीच्या सर्व जागांवर 3 वर्षांची सूट देण्यात येणार आहे तर SC/ST श्रेणीच्या सर्व पदांसाठी 5 वर्षांची सूट दिली जाणार आहे.

कशी होणार उमेदवाराची निवड?

या जागांवर नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराला थेट इंटरव्ह्यू द्यावा लागणार आहे. उमेदवाराने दिलेल्या अर्जाच्या आधारावर शॉर्टलिस्ट केलेल्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल. खरंतर, यूपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. पण यातूनच शॉर्टलिस्टिंग करून इंटरव्ह्यू घेतला जाईल. यामुळे उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करताना सगळी माहिती आणि महत्त्वाची कागदपत्रं योग्य पद्धतीने जोडणं महत्त्वाचं आहे. (jobs alert sarkari naukri upsc recruitment 2021 for processing assistant and various post)

संबंधित बातम्या – 

RBI Recruitment 2021 : ज्युनिअर इंजिनीअरच्या पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

फक्त 50 हजार लावून कमवा 2.50 लाख, आताच सुरू करा डबल फायदा असलेला ‘हा’ बिझनेस

Job Alert: दहावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी; अनेक पदांवर भरती

MP NHM CHO 2021 : कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या 3570 पदांवर भरती

(jobs alert sarkari naukri upsc recruitment 2021 for processing assistant and various post)