महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागात अप्रेंटिस भरती, वातावरणीय बदलांच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळणार

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग इंटर्नशिप कार्यक्रम 2021-22 साठी 20 इंटर्नसची निवड करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांकडून 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागात अप्रेंटिस भरती, वातावरणीय बदलांच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळणार
वातवरणीय बदल
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 4:13 PM

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून अप्रेंटिस साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग इंटर्नशिप कार्यक्रम 2021-22 साठी 20 इंटर्नसची निवड करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांकडून 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. विभागाकडून पदव्युत्तर, रिसर्च स्कॉलर आणि पदवीधर यांना अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. अप्रेटिंसचा कालावधी 6 महिने असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागात एकूण 20 पदांवर इटर्नशिप करण्याची संधी दिली जाईल. विद्यार्थ्यांना पर्यावरण विभाग, वातावरणातील बदल, त्यांचे आंतरराष्ट्रीय संदर्भ यासंदर्भात काम करण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासन वातावरणीय बदलांवर अभ्यासासाठी तरुणांना इंटर्नशीपची संधी उपलब्ध करुन देतेय, याचा आनंद असल्याचं पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

पर्यावरण विभागानं इटर्नशिप प्रोग्राम हा कचरा व्यवस्थापन, जैवविविधता, नवीनकरणीय ऊर्जा, जलसंधारण, सामाजिक जाणीव जागृतीसंदर्भात आहे. याअंतर्गत राज्यातील 3500 शहरी आणि ग्रामीण स्वराज्य संस्थासोबत काम करावं लागणार आहे.

अर्ज कोण करु शकतं?

स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी, पर्यावरण, रासायनिक, रोबोटिक, मास कम्युनिकेशन, ग्राफिक डिझायनर, वेब डिझायनर या पैकी कोणत्याही शाखेतील पदवी धारण करणारे विद्यार्थी अर्ज दाखल करु शकतात.

वयोमर्यादा

शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचं वय 26 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. पर्यावरण विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करण्यात येतील, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल विभागानं दिली आहे.

पॉवरग्रिडमध्ये 137 पदांवर भरती

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून फील्ड इंजिनिअर पदावर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय. पॉवरग्रिडकडून एकूण 137 पदांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी powergridindia.com ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. फील्ड इंजिनिअर पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 13 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2021 आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम दिनांकाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन वाचून घेणं आवश्यक आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मध्ये इंजिनिअर्सना नोकरीची मोठी संधी आहे.

इतर बातम्या:

Bank Job 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी भरती, पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 2,357 पदांसाठी भरती, उद्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

Maharashtra Government invites application for internship for climate fellowship programme

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.