AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Job News: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये 1388 पदांसाठी पदभरती, आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये 1388 पदांसाठी पदभरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येते. Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment

Job News: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये 1388 पदांसाठी पदभरती, आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 6:53 PM
Share

मुंबई: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये 1388 पदांसाठी पदभरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येते. भारतीय नौदलासाठी जहाजबांधणीचं काम माझगाव डॉक शिपबिल्डर्सकडून केलं जातं. पात्र भारतीय नागरिकांकडून 1388 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण 24 प्रकारच्या पदासांठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. (Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment of Non-Executives on fix term contract basis for 1388 post)

अर्ज दाखल कुठे करायचा?

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये 1388 जागांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://mazagaondock.in या वेबसाईटला बेट द्यावी. तिथे करिअर या लिंकवर क्लिक करा, पुढे ऑनलाईन रिक्रुटमेंट त्यानंतर पुढे नॉन एक्झ्युकेटिव्ह पदांवर क्लिक करा. यानंतर आवश्यक ती सर्व माहिती भरुन नोंदणी करा. यांतर तुम्हाला ईमेल प्राप्त होईल. यानंतर युझरनेम आणि पासवर्डद्वारे लॉगीन करा तुम्ही ज्यापदासाठी अर्ज करणार आहात. त्या पदासाठी असणारी पात्रता पाहून अर्ज दाखल करा.

पदाचे नाव आणि संख्या

  1. एसी रेफ मेकॅनिक: 05
  2. कॉम्प्रेसर अटेंडंट: 05
  3. कारपेंटर: 81
  4. चिपर ग्राईंडर: 13
  5. कॉम्पोझिट वेल्डर्स: 132
  6. डिझेल क्रेन ऑपरेटर: 05
  7. डिझेल कम मोटर मेकॅनिक: 04
  8. ज्यु. ड्राफ्टमन: 54
  9. इलेक्ट्रिशयन: 204
  10. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: 55
  11. फिटर: 119
  12. ज्यूनिअर क्वालिटी इन्स्पेक्टर: 13
  13. गॅस कटर: 38
  14. मेकॅनिस्ट: 28
  15. मिलराईट मेकॅनिक:10
  16. पेंटर:100
  17. पाईप फिटर 140
  18. रिग्गर: 88
  19. स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर: 125
  20. स्टोअर किपर: 10
  21. यूटिलीटी हँड: 14
  22. प्लॅनर इस्टिमेटर: 008
  23. पॅरामेडिकस: 02
  24. यूटिलीटी हँड : 135

शैक्षणिक पात्रता:

माझगाव डॉक शिपब्लिल्डर्स लिमिटेड द्वारे देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये वरील पदासांठी पात्रता देण्यात आली आहे. या पदांसाठी विविध पदांनुसार आयटीआय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

18 ते 38 वर्ष वय असणाऱ्या वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. खुल्या, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये फी आकारण्यात येईल. 11 जूनपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 4 जुलैपर्यंत अर्ज दाखळ करता येणार आहेत. जुलै महिन्याच्या अखेरिस परीक्षा होण्याची शक्यता आहे. लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट आणि अनुभावाच्या आधारे उमेदवारांची तीन वर्षांसाठी निवड केली जाईल. पुढे आणखी दोन वर्ष मुदतवाढ देण्यात येणार आहे. पदानुसार 13200 ते 64360 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या:

Medical Jobs: ESIC मध्ये मेडिकल ऑफिसर पदावर भरती प्रक्रिया, पुणे येथे थेट मुलाखतीद्वारे निवड

Indian Army Jobs: इंडियन आर्मीमध्ये NCC च्या C सर्टिफिकेटधारक उमेदवारांसाठी मोठी संधी, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

(Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment of Non-Executives on fix term contract basis for 1388 post)

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.