mhada recruitment 2021: म्हाडात नोकरीची संधी; अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

परीक्षा शुल्क भरण्यासाठी 15 ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली होती. परंतु, आता म्हाडाकडून यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना 21 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. तसेच 22ऑक्टोबरपर्यंत अर्ज शुल्क भरावे लागेल. | Mhada Recruitment process 2021

mhada recruitment 2021: म्हाडात नोकरीची संधी; अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ
Mhada
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 1:55 PM

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडात नोकरभरतीची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाकडून विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज दाखल करण्यासाठी 14 ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली होती. तसेच परीक्षा शुल्क भरण्यासाठी 15 ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली होती. परंतु, आता म्हाडाकडून यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना 21 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. तसेच 22ऑक्टोबरपर्यंत अर्ज शुल्क भरावे लागेल.

म्हाडामध्ये कोणत्या पदांसाठी भरती?

म्हाडामध्ये विविध पदांच्या 565 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अंतर्गत अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक या जागा भरल्या जाणार आहेत. पदभरतीमध्ये आरक्षित वर्गाला सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील म्हाडाची अधिकृत https://mhada.gov संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा?

कार्यकारी अभियंता (स्थापत्य)-13 उप अभियंता (स्थापत्य)-12 मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी-2 सहाय्यक अभियंता (स्थापत्य)- 30 सहायक विधी सल्लागार-2 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)-119 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक-6 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-44 सहाय्यक-18 वरिष्ठ लिपीक -73 कनिष्ठ लिपिक-टंकलेखक-207 लघुटंकलेखक-20 भूमापक-11 अनुरेखक-7

राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) लवकरच राज्यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाण्याचे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला वेग देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विविध सरकारी विभागांना रिक्त पदांचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार विविध विभागाची मागणीपत्र एमपीएससीला प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचं मागणीपत्र आयोगाला झाले आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 376 जागांसाठी भरती केली जाईल. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जागा कमी काढल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या: 

mhada lottery result 2021: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8984 घरांसाठी आज ऑनलाइन सोडत निघणार

(Job Opportunities: Mhada Recruitment process 2021)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.