AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAF Group C Recruitment 2021 : हवाई दलात 1500 हून अधिक पदांवर रिक्त जागा, जाणून घ्या कसा करावा अर्ज

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार (IAF Group C Recruitment 2021) अधिकृत संकेतस्थळ indianairforce.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 3 एप्रिल 2021 पासून सुरु झाली आहे. (More than 1500 vacancies in the Air Force, know how to apply)

IAF Group C Recruitment 2021 : हवाई दलात 1500 हून अधिक पदांवर रिक्त जागा, जाणून घ्या कसा करावा अर्ज
कॉमन प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या स्टेप्सने करा डाउनलोड
| Updated on: Apr 04, 2021 | 12:13 AM
Share

IAF Group C Recruitment 2021 नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेने ग्रुप सी सिव्हिलियन (IAF Group C) पोस्टवर बंपर भरती जारी केली आहे. या रिक्त जागेसाठी (IAF Group C Recruitment 2021) अंतर्गत एकूण 1515 पदांवर भरती होईल. वायु सेना भर्ती मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या रिक्त स्थानाविषयी माहिती देण्यात आली आहे. या रिक्त स्थानाची खास बाब म्हणजे यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारही काही पदांसाठी अर्ज करू शकतात. भारतीय वायुसेनेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार स्टेनो, पर्यवेक्षक, कुक, हाऊस कीपिंग स्टाफ, एमटीएस, एलडीसी, सीएस व एसएमडब्ल्यू, सुतार, लॉन्डरमॅन, हिंदी टायपिस्ट यासह अनेक पदे रिक्त आहेत. (More than 1500 vacancies in the Air Force, know how to apply)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार (IAF Group C Recruitment 2021) अधिकृत संकेतस्थळ indianairforce.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 3 एप्रिल 2021 पासून सुरु झाली आहे. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 2 मे 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्जाची तारीख संपल्यानंतर, अधिकृत वेबसाईटवरून ही लिंक काढली जाईल.

IAF Group C पदांसाठी असा करा अर्ज

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम वायु सेना भर्ती बोर्ड indianairforce.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. मुख्यपृष्ठावरील भरती(Recruitment) विभागात जा. त्यामध्ये, “APPLICATION FOR THE POST OF ——– AND CATEGORY” या लिंकवर क्लिक करा. यामध्ये ग्रुप सी(Group C) पर्यायावर जाऊन नोंदणी करा. नोंदणी फॉर्म डाउनलोड करा. त्याचवेळी, अधिसूचनेत दिलेल्या सूचनांनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत अर्ज प्रक्रिया चालू राहते.

या तारखा लक्षात ठेवा

अर्ज प्रारंभ तारीख – 3 एप्रिल 2021 अर्ज करण्याची अंतिम तारीख – 2 मे 2021

या पदांवर होईल भरती

वेस्टर्न एअर कमांड – 362 दक्षिणी हवाई कमांड – 28 ईस्टर्न एअर कमांड – 132 सेंट्रल एअर कमांड- 116 देखभाल कमांड – 479 प्रशिक्षण कमांड – 407 हाऊस किपिंग स्टाफ (महिला स्कॅव्हेंजर) – 345 कुक – 124 एमटीएस (मल्टी टास्किंग स्टाफ) – 404 एलडीसी – 53 स्टोअर कीपर – 15 हिंदी टायपिस्ट – 12 चालक – 49

वयोमर्यादा

सर्व पदांसाठी किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे आहे. ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना पाच वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये 10 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया

यात निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेस हजेरी लावावी लागते. लेखी चाचणी शैक्षणिक गुणवत्तेवर आधारीत असेल. या लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, न्युमेरिकल अॅप्टीट्युड, जनरल इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस या विषयांचा समावेश असेल. हा पेपर हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत येईल. (More than 1500 vacancies in the Air Force, know how to apply)

इतर बातम्या

मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली; मार्गदर्शक तत्त्वे जारी

शिवसेना नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नाला तुफान गर्दी, अनेकांच्या तोंडावर मास्क नाही, कोरोना नियम नेमके कुणासाठी?

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.