Fire Brigade Recruitment | दहावी उत्तीर्ण आहात? अग्निशमन दलात खाजगी कंत्राटी पद्धतीने नोकरभरती

अग्निशमन दलातील रुग्णवाहिका, जीप आणि कार चालवण्यासाठी खाजगी वाहक भरती केले जाणार आहेत. (BMC Fire Brigade Recruitment)

Fire Brigade Recruitment | दहावी उत्तीर्ण आहात? अग्निशमन दलात खाजगी कंत्राटी पद्धतीने नोकरभरती
मुंबई अग्निशमन दल

मुंबई : बेस्टनंतर अग्निशमन दलातही (Fire Brigade) खाजगीकरण करण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. अग्निशमन दलात 54 खासगी कंत्राटी ड्रायव्हर नेमले जात आहेत. (Mumbai BMC Fire Brigade Drivers Recruitment on private contract basis)

आग लागणे, इमारत किंवा घर कोसळणे, पाण्यात बुडालेल्या व्यक्तींना वाचवणे अशा अनेक कामांसाठी मुंबई अग्निशमन दलाला बोलावले जाते. अग्निशमन दलातील पदे रिक्त असल्याने अग्निशमन दलात जीप, कार यासारखी वाहने चालवण्यासाठी 54 खासगी कंत्राटी ड्रायव्हर नेमले जात आहेत.

कंत्राटी पद्धतीने चालक भरती का?

मुंबई अग्निशमन दलात यंत्रचालक संवर्गाची 665 पदे असून यापैकी 158 पदे रिक्त आहेत. आपत्कालीन परिस्थितीत पंप ऑपरेट करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे प्रक्षिशित यंत्रचालकांना जीप किंवा कार चालवण्यास तैनात केले, तर आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होते.

काळबादेवी येथे लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार अग्निशमन दलातील रुग्णवाहिका, जीप आणि कार चालवण्यासाठी खाजगी वाहक भरती केले जाणार आहेत.

किती पदं रिक्त?

मुंबई महापालिका रिक्त जागा भरण्याऐवजी खाजगी कंत्राटदाराकडून नोकर भरती करणार आहे. अग्निशमन दलात एकूण 665 यंत्रचालक संवर्गाची पदे आहेत. परंतु, अनुभवी चालक मिळत नसल्याने दोन वर्षासाठी 54 कंत्राटी चालक 84 वाहनं चालवण्यासाठी घेतले जाणार आहेत.

5 कोटी 97 लाख 87 हजार रुपये यावर खर्च केला जाणार आहे. मे. केएचएफएम हॉस्पिलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेसला अटी आणि शर्तीवर हे काम दिले जाणार आहे. अग्निशमन पदावर काम करणाऱ्या उमेदवाराकडे पाच वर्षांचा अनुभव आणि एक वर्ष अवजड वाहने चालवण्याचा परवाना असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. (Mumbai BMC Fire Brigade Recruitment on private contract basis)

काय असतील अटी?

उंची – 165 सेंमी
वजन – 50 किलो
दृष्टी – चष्मा नसावा
वयोमर्यादा – 21 ते 45 वर्ष
शैक्षणिक अर्हता – दहावी उत्तीर्ण

अग्निशमन दलात कंत्राटी पद्धतीने खासगी वाहनचालकांच्या येणाऱ्या भरतीच्या प्रस्तावाला आमचा विरोध आहे. या प्रस्तावाला काँग्रेस विरोध करणार आहे. सत्तेत बसलेल्यांनी विचार करायला हवं, पालिकेची कोणत्या दिशेला वाटचाल चाललेली आहे. भाववाढीसाठी नवीन प्राधिकरण तयार केलं जाणार आहे. मग स्टँडिंग कमिटी कशासाठी आहे? हे प्रशासन मंत्रालय जे बोलतं त्यावर चालतं, अशी टीका महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली.

संबंधित बातम्या :

जगात मंदी; UPPCL, एनटीए, बीईएलमध्ये नोकऱ्यांची सुवर्णसंधी

मुंबईत रेल्वेमध्ये 2500+ अ‍ॅप्रेंटिसच्या रिक्त पदांसाठी भरती, अर्ज करा अन् मिळवा नोकरी

(Mumbai BMC Fire Brigade Recruitment on private contract basis)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI