नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि अतिविशेषोपचार रुग्णालय यांच्याकडून सहायक प्राध्यापक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागपूर येथील या महाविद्यालयांमध्ये रुग्णसेवेकरता उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड
प्रातिनिधीक फोटो


नागपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि अतिविशेषोपचार रुग्णालय यांच्याकडून सहायक प्राध्यापक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागपूर येथील या महाविद्यालयांमध्ये रुग्णसेवेकरता उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांनी नागपूरला थेट मुलाखतीसाठी हजर राहावं, असं आवाहन करण्यात आलंय. उमेदवारांटी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असून नियुक्ती केवळ 120 दिवसांसाठी दिली जाणार आहे.

मुलाखती कुठं होणार?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या अधिष्ठाता कार्यालयात मुलाखती 22 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र आणि IBPS PO Recruitment 2021: आयबीपीएसकडून प्रोबेशनरी ऑफिसर्स भरती जाहीर, 4135 जागांवर संधी, अर्ज कुठे करायचा?छायांकित प्रतीसह उपस्थित राहावं, असं सांगण्यात आलं आहे.

शैक्षणिक पात्रता

सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं MD आणि DM पर्यंतचं शिक्षण झालेलं असावं. उमेदवारांकंडे एका वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

महावितरणमध्ये 69 जागांवर अप्रेटिंसची संधी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण या कंपनीनं 69 जागांवर अप्रेंटिससाठी अर्ज मागवले आहेत. वयाची 18 वर्ष पूर्ण असणारे आणि दहावी बारावीसह आयटीआयमधील संबंधित ट्रेड उत्तीर्ण असणारे विद्यार्थी अर्ज दाखल करु शकतात. इलेक्ट्रिशयन, वायरमन आणि कोपा या पदासाठी अप्रेंटिस करण्याची संधी आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांना अमरावती जिल्ह्यात नोकरी करावी लागेल. इलेक्ट्रिशयन (32) वायरमन (32) आणि कोपा (05) जागांवर अप्रेंटिससाठी अर्ज मागण्यात आले आहेत. अप्रेंटिससाठी इच्छुक उमेदवारांनी अर्जातील तपशील भरुन कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईंट, अमरावती मोर्शी रोड,अमरावती इथं अर्ज पाठवणं आवश्यक आहे. महावितरणमध्ये अप्रेंटिससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही.

इतर बातम्या:

IBPS PO Recruitment 2021: आयबीपीएसकडून प्रोबेशनरी ऑफिसर्स भरती जाहीर, 4135 जागांवर संधी, अर्ज कुठे करायचा?

महावितरणमध्ये 69 जागांवर अप्रेटिंस करायचीय? दहावी बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी

Nagpur Government Medical College applications invited for 69 Assistant Professor post

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI