AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावी पास आहात? मग थेट करा संरक्षण दलात नोकरी, मोठी बंपर भरती सुरू, थेट मिळवा केंद्र शासनाची नोकरी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे. थेट बारावी पास असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

बारावी पास आहात? मग थेट करा संरक्षण दलात नोकरी, मोठी बंपर भरती सुरू, थेट मिळवा केंद्र शासनाची नोकरी
| Updated on: Dec 24, 2023 | 12:33 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. मग इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 400 जागांसाठी होत आहे. विविध पदांसाठी ही भरती होत आहे. बारावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ही एकप्रकारे मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. संघ लोकसेवा आयोगातर्फे राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अ‍ॅकॅडमीसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच भरतीसाठी वयाची अट देखील ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत.

उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांना या भरतीसाठी परीक्षा ही देखील द्यावी लागणार आहे. 21 एप्रिल 2024 रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. Union Public Service Commission च्या साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही व्यवस्थितपणे मिळेल. साईटवर जाऊनच या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला अर्ज देखील करावा लागणार आहे.

लष्कर 208, हवाई दल 120, नौदल 42, नौदल अकॅडमी 30 याप्रमाणे ही भरती पार पडणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. बारावी पास असलेल्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे.

या भरती प्रक्रियेसाठी ओबीसी आणि ओपनमध्ये असलेल्या उमेदवारांना 100 रूपये फिस ही भरावी लागेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवाराने हे व्यवस्थित तपासावे की, आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत. खरोखरच बारावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे. मग उशीर न करता झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार