AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एनएलसी इंडिया लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, बारावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, केंद्र शासनाची नोकरी..

NLC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची एक मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

एनएलसी इंडिया लिमिटेडमध्ये 'या' पदांसाठी भरती, बारावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, केंद्र शासनाची नोकरी..
NLC India Limited
| Updated on: Apr 22, 2024 | 12:26 PM
Share

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. ही भरती प्रक्रिया एनएलसी इंडिया लिमिटेडकडून राबवली जातंय. विशेष म्हणजे ही भारताची नवरत्न कंपनी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

एनएलसी इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 34 पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

nlcindia.in या साईटवर जाऊन आपल्याला भरतीसाठी अर्ज हा करावा लागेल. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. 24 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी उमेदवाराकडे इंजिनिअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा असायला हवा. औद्योगिक कामगार पदासाठी देखील उमेदवाराकडे इंजिनिअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा असावा. लिपिक सहाय्यक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार बारावी पास आणि आयटीआय पास असलेला असावा.

या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही आपल्याला https://www.nlcindia.in/new_website/careers/Detailed%20Advt%2002%202024.pdf या लिंकवर आरामात मिळेल. परीक्षेतून उमेदवाराची निवड केली जाईल, लेखी परीक्षा उमेदवाराची घेतली जाईल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 24 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

Follow Us
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट...
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट....
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....