RBI recruitment 2021 | आरबीआय ऑफिस अटेंडेंट परीक्षा मराठीमध्ये देता येणार, महाराष्ट्रातील उमेदवारांना मोठा दिलासा

आरबीआयमध्ये ऑफिस अटेंडेटच्या 841 पदांसांठी भरती करण्यात येत असून याची परीक्षा मराठी भाषेतून देता येणार आहे. RBI Office Attendants examinations

RBI recruitment 2021 | आरबीआय ऑफिस अटेंडेंट परीक्षा मराठीमध्ये देता येणार, महाराष्ट्रातील उमेदवारांना मोठा दिलासा
आरबीआय
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 2:59 PM

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) ऑफिस अटेंडेंट (Office Attendant Recruitment 2021) या पदासाठी भरती सुरु आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आरबीआयमध्ये मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आरबीआयमध्ये ऑफिस अटेंडेटच्या 841 पदांसांठी भरती करण्यात येत आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. कारण ही परीक्षा तुम्हाला मराठी विषयातून देता येणार आहे. या पदासाठीची पात्रता फक्त 10 वी उत्तीर्ण ठेवण्यात आली होती. (RBI Recruitment Office Attendants examination applicants gave examination in Marathi Language)

मराठी भाषेतून परीक्षा देण्याची संधी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील ऑफिस अटेंडेंट पदासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च होता. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला असेल त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. कारण ही परीक्षा इंग्रजीसह मराठी भाषेतून देता येणार आहे.

9 आणि 10 एप्रिलला परीक्षा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील ऑफिस अटेंडेंट पदाची परीक्षा येत्या 9 आणि 10 एप्रिलला होणार आहे. परीक्षेत एकूण 120 प्रश्न विचारले जाणार आहेत. ही परीक्षा देशभरातील 173 केंद्रांवर होणार आहे.120 गुणांमध्ये तार्किक क्षमता 30,सामान्य इंग्रजी 30 ,सामान्यज्ञान 30 आणि अंकगणित चाचणी यासाठी 30 प्रश्न विचारले जातील. परीक्षेसाठी 90 मिनिटे वेळ असेल. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण कापले जाणार आहेत.

मुंबईत सर्वाधिक पदांची भरती

नोटिफिकेशन नुसार परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची विविध विभागात पोस्टिंग केली जाईल. अहमदाबाद मध्ये 50, बंगळुरूमध्ये 28, भोपाळमध्ये 25, चंडीगढ़मध्ये 31, चेन्नईमध्ये 71, हैदराबादमध्ये 57, जयपूर 43, कानपूरमध्ये 69, मुंबईत 202, नागपूरमध्ये 55 आणि नवी दिल्ली मध्ये 50 पदे निर्धारित करण्यात आली आहेत.इतर माहितीसाठी उमेदवारांनी आरबीआयच्या वेबसाईटला भेट द्यावी.

संबंधित बातम्या

CBSE Board Exam: सीबीएसईकडून प्रात्याक्षिक परीक्षेसाठी फोटो अपलोडिंग अनिवार्य, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

आता तयारीला लागा, MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर, 14 मार्चला राज्यसेवा पूर्व परीक्षा 

(RBI Recruitment Office Attendants examinations applicants gave examination in Marathi Language)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.