AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAF Recruitment 2021: भारतीय हवाई दलात 255 ग्रुप सी सिव्हिलियन पदांसाठी भरती, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख नजीक

ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, ते जाहिरात देऊन जारी केलेल्या अर्जाद्वारे 13 मार्च 2021 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. (Recruitment for 255 Group C civilian posts in Indian Air Force, application deadline approaching)

IAF Recruitment 2021: भारतीय हवाई दलात 255 ग्रुप सी सिव्हिलियन पदांसाठी भरती, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख नजीक
कॉमन प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या स्टेप्सने करा डाउनलोड
| Updated on: Mar 10, 2021 | 5:25 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलात सिविलियन भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना सूचना आहे. हवाई दलाच्या दक्षिण पश्चिम हवाई कमांड मुख्यालयात 255 ग्रुप सी सिविलियनच्या भरतीची अधिसूचना फेब्रुवारीमध्ये देण्यात आली होती. या पदांसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, ते जाहिरात देऊन जारी केलेल्या अर्जाद्वारे 13 मार्च 2021 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. ज्या पदांसाठी अर्ज केले जात आहेत त्यामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस), हाऊस किपिंग स्टाफ (एचकेएस), मेस स्टाफ, कुक (ओजी) इत्यादींचा समावेश आहे. (Recruitment for 255 Group C civilian posts in Indian Air Force, application deadline approaching)

अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

भारतीय वायुसेनेतील ग्रुप सी सिव्हिलियनच्या पदांवर भरतीसाठी इच्छुक उमेदवार भरती अधिसूचनेसह दिलेला अर्ज डाउनलोड करू शकतात. हा अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर आणि आवश्यक प्रमाणपत्रे जोडल्यानंतर रिक्त जागांसंबंधी हवाई दलाच्या स्टेशनवर पत्त्यावर सबमिट करा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जाहिरात तारखेपासून 30 दिवस (13 मार्च) निश्चित केली आहे.

भारतीय वायु सेना ग्रुप सी सिविलियन भरती पदे

मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) – 61 पद हाऊस किपिंग स्टाफ (एचकेएस) – 49 पद हाऊस किपिंग स्टाफ (एचकेएस) – 49 पद सीएमटीडी (ओजी) – 38 पद कुक (ओजी) – 38 पद एलडीसी – 11 पद लॉन्ड्रीमॅन – 9 पद फायरमॅन- 8 पद क्लर्क हिंदी टायपिस्ट – 2 पद स्टेनो ग्रेड 2 – 4 पद वुल्कॅनायजर – 2 पद स्टोर किपर – 3 पद पेंटर – 4 पद कुक – 3 पद आया / वार्ड सहायिका – 1 पद कारपेंटर – 3 पद स्टोर (सुप्रींटेंडेंट) – 3 पद

कशी असेल निवड प्रक्रिया?

1. सर्व अर्जाची वयोमर्यादा, किमान पात्रता, कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांच्या संदर्भात छाननी केली जाते. त्यानंतर पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर देण्यात येईल.

2. पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेस हजेरी लावावी लागेल. लेखी परीक्षा किमान शैक्षणिक पात्रतेवर आधारीत असेल.

3. लेखी परीक्षेमध्ये जनरल इंटेलिजेंस अॅण्ड रिझनिंग, संख्यात्मक योग्यता, सामान्य इंग्रजी, सामान्य ज्ञान यांचा समावेश असेल.

4. प्रश्नपत्रिका कम उत्तरपत्रिका इंग्रजी व हिंदीमध्ये असेल.

5. पात्र उमेदवारांची यादी शॉर्टलिस्टेड केली जाईल आणि त्यांना कौशल्यासाठी बोलावले जाईल. (Recruitment for 255 Group C civilian posts in Indian Air Force, application deadline approaching)

इतर बातम्या

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, लाभ कुणाला मिळतो? अर्ज कुठे करायचा?

आधी छातीत चाकू खोपसून हत्या, मग गाड्यांनी चिरडलं, अपघात सांगून विम्याचे पैसे उकळणाऱ्या टोळीचा भांडाफोड

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.